पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तहसीलदार श्रीकांत पाटिल यांच्या उपस्थितीत एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा,

इमेज
  तहसीलदार श्रीकांत पाटिल यांच्या उपस्थितीत एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा, प्रतिनिधि: महेश गडदे, इंदापूर दि.२८,आज पळसदेव या ठिकाणी राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्री श्रीकांत पाटील साहेब तसेच एल.जी बनसुडे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे व पळसदेवचे सरपंच इंद्रायणी सुजित मोरे, उपसरपंच पुष्पलता राजेंद्र काळे ,सदस्यां जयश्री शेलार, सदस्य कैलास भोसले , सचिव नितिन बनसुडे, प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे , तात्यासाहेब बंडगर, दादासाहेब खारतोडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते . या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या माहितीचा अधिकार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे अनुभवाचे बोल या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांचा करण्यात आले, तसेच इंदापुरचे  तहसीलदार श्रीकांत पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकारी कायद्याविषयी मार्गदर्शन केले, हा कायदा माहिती स्वातंत्र्याचा कायदा आहे.या कायद्याने ...

किशोरवयीन मुलीसाठी आॕनलाईन समुपदेशन शिबीर संपन्न.

इमेज
किशोरवयीन मुलीसाठी आॕनलाईन समुपदेशन शिबीर संपन्न. आ   रोहित पवार यांचे वाढदिवसाच्यानिमित्ताने पुणे जिल्हा एकल प्राथमिक महिला आघाडी यांचे वतीने किशोरवयीन मुलीसाठी आॕनलाईन समुपदेशन शिबीर संपन्न       प्रतिनिधि:महेश गडदे,  दि २६ पुणे जिल्हा एकल प्राथमिक महिला शिक्षक आघाडी यांचे वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा अंतर्गत किशोरवयीन मुलींच्या समस्या , मासिक पाळी व्यस्थापन , स्त्रीयांचे विविध आजार व समस्या याबाबत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांचे हस्ते एक्सेलेन्स ॲवार्ड व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत , बारामती शासकीय मेडिकल काॕलेज सदस्य , सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डाॕ राजेश कोकरे यांचे आॕनलाईन मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. आॕनलाईन शिबीरासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे २०० किशोरवयीन मुली , महिला शिक्षिका , महिला पालक सहभागी झाल्या.डाॕ राजेश कोकरे यांनी मासिक पाळी व्यवस्थापन , किशोरवयीन मुली व महिलांमधील विविध आजार व घ्यायची काळजी याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. सदर मार्गदर्...

भष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन,

इमेज
  भष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन, प्रतिनिधी:महेश गडदे, महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये लोकायुक्त कायदा मंजूर करावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचे ठरवले आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्रातून जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालय यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेला आहे,  लोकपाल संदर्भामध्ये माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या चार ते पाच बैठका झालेले आहेत तरी देखील या विषयाकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून सदर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी करण्याचे ठरवले आहे,  या संदर्भामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन तालुका संघटक आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून तहसीलदार इंदापूर यांना निवेदन देण्यात आलेले आहे,  हे निवेदन तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले जावे यासाठी निवेदन देण्यात आलेला आहे तसेच त्याबरोबर लोकशाही दिन महीन्याच्या तिसर्या सोमवारी घेण्यातयावा व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी सोडले जावेत या उद्देशाने देखील भ्रष्टाचार विरोधी जन...

शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड याचा सत्कार.

इमेज
  शिक्षक समिती इंदापूर यांचे वतीने निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड याचा सत्कार . प्रतिनिधि: महेश गडदे, दि १९ निमगाव केतकी येथील पालखीतळ शेजारी राहणारा सर्वसामान्य कुटुंबातील  युवक तेजस गायकवाड याने गौरी गणपती उत्सवानिमित्त तयार केलेल्या देखावा सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.त्याने या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची १०० वर्षे (१८५७ - १९४७) सचिञ दाखवली असून त्यामध्ये  दिल्ली येथील लाल किल्ला , सरदार वल्लभभाई पटेल स्मारक , डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भेट , आजपर्यंत पंतप्रधान , भारतरत्न पुरस्कार विजेते , आॕलंपीकवीर , गेट वे आॕफ इंडिया असा अप्रतिम कलाकृती केली असून त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरवर्षी नवनवीन कल्पना व विषय घेवून अप्रतिम देखावे तयार करण्यात हातखंडा असलेला तेजस नवीन पिढीला प्रेरणा देणारा सजृनशील युवक आहे. इंदापूर तालुका शिक्षक समितीचे पदाधिकारी यांनी तेजय गायकवाड या उपक्रमाचे कौतुक करून त्याचा फेटा , पुष्पहार , पुस्तक देवून सन्मान केला.प्रसंगी शिक्षक सोसायटी माजी चेअरमन किरण म्हेञे , शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे , जुनी...

इंदापूर: सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले,

इमेज
  इंदापूर: सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण. प्रतिनिधि: महेश गडदे, श्री नरसिंह प्रासादिक गणेशोत्सव मित्र मंडळ, श्री संत नामदेव मंदिर कासार पट्टा यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत,  तसेच गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या 101 व्या स्थापना वर्षा च्या अनुषंगाने ,दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी,  इंदापूरच्या नगराध्यक्षा माननीय सौ अंकिता मुकुंद शहा, व श्री मुकुंद शेठजी शहा, सचिव इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या हस्ते सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले,  जागतिक बांबू दिनानिमित्त माननिय नगराध्यक्षा सौ अंकिता ताई शहा यांच्या हस्ते बांबूचे रोपटे लावून वृक्षारोपनास सुरुवात केली,  मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षमित्र श्री चंद्रकांत देवकर, श्री सुनील शिरसठ ,विद्यालयाचे शिक्षक श्री सुनील मोहिते सर ,नगरपरिषदेचे श्री अल्ताफ पठाण, यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष श्री भरत देशमाने, तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अशोक चिंचकर, श्री अमर लेंडवे, गौरवगा नबोटे,अनिकेत गा...

इंदापूरातील शिक्षक:अरुण राऊत पाच वर्षापासुन दररोज देत आहेत गरिबांना जेवण

इमेज
  इंदापूरातील शिक्षक:अरुण राऊत पाच वर्षापासुन दररोज देत आहेत गरिबांना जेवण. प्रतिनिधि महेश गडदे, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सहशिक्षक श्री.अरुण लक्ष्‍मण राऊत,त्यांच्या पत्नी सौ.वैशाली अरुण राऊत व त्यांची मुलगी अपेक्षा व मुलगा वैभव हे गेल्या पाच वर्षांपासून दररोज संध्याकाळी इंदापूर एस. टी. स्टँड मधील मुक्कामी असणाऱ्या गरजू , गोरगरीब व निराधार लोकांना स्वखर्चाने मोफत अन्नदान करत आहेत. दररोज संध्याकाळी१० ते १५ लोकांना मोफत जेवण देत आहेत. 29नोव्हेंबर 2016 रोजी शिक्षक अरुण राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रमास सुरुवात केला होता, तेव्हापासून पाच वर्ष झाली दररोज अन्नदानाचे पवित्र काम स्वखर्चाने करत आहेत,कोरोना काळामध्ये देखील त्यांनी अन्नदानाचे काम चालु ठेवले, त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन समाजातील काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत दिली, दररोज संध्याकाळी राऊत सरांची पत्नी सै वैशाली व मुलगी अपेक्षा दोघेजन जेवण बनवून देतात.सर अरुण राऊत आणि त्यांचा मुलगा वैभव दररोज सायंकाळी गरजू लोकांना इंदापूर मधील एस टी स्ट...

सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करण्यास शिक्षणमंञी ना वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार

इमेज
सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करण्यास शिक्षणमंञी :वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार  ,      प्रतिनिधि महेश गडदे, सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करण्यास शिक्षणमंञी ना वर्षाताई गायकवाड यांचे सोबत बैठक घेणार.शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे. दि १७ सातव्या वेतन आयोगातील ञुटी दूर करुन १ जाने २००४ नंतरच्या शिक्षकांवर वरिष्ठ वेतन श्रेणीत झालेल्या वेतन तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा वर्षाताई गायकवाड व मा शिक्षण राज्यमंञी मा ना बच्चू कडू यांचे समवेत बैठक घेवून लवकरच प्रश्न निकाली काढू असे आश्वासन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले. क्षक समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदयजी शिंदे सासवड येथे आले असता सातव्या वेतन आयोग ञुटी समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.प्रसंगी भारत ननवरे , संतोष हेगडे , भुषण जौंजाळ , सुनिल वाघ , भारत गायकवाड , संतोष राक्षे , संदिप दुर्गे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच पुणे जिल्हा शाखेच्यावतीने नुतन शिक्षक पतसंस्था पदाधिकारी यांचा सत्कार...

इमेज
महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच पुणे जिल्हा शाखेच्यावतीने नुतन शिक्षक पतसंस्था पदाधिकारी यांचा सत्कार... प्रतिनिधि महेश गडदे दि १० महाराष्ट्र राज्य एकल सेवा मंच पुणे जिल्हा शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आचार्य भवन शिरूर येथे कोरोना बाबतचे सर्व शासकीय नियम पाळून संपन्न झाला.  या कार्यक्रमात जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव मांडवे , शिरूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संभाजी धुमाळ , खेड तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन हिरामण कुसाळकर , पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे संचालक आबासाहेब खवले यांचा एकल सेवा मंच राज्य अध्यक्ष एल पी नरसाळे , राज्य मार्गदर्शक श्री राजेंद्र गरूड श्री शरद मचाले यांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेसे यांनी केले. प्रसंगी बापू साहेब लांडगे , कल्याण कोकाटे , मारूती निकम , वैशाली काटे संदीप थोरात यांनी मनोगते व्यक्त केली.शिक्षक हिताचे निर्णय घेण्यासाठी सदैव तत्पर राहू. शिक्षक पतसंस्था अधिकाधिक बळकट करू असे सांगितले.      ...

कै.हरुबाई पंढरीनाथ कांबळे यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखत निधन

इमेज
  कै.हरुबाई पंढरीनाथ कांबळे यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखत निधन . रूई ता.इंदापुर येथील हरुबाई पंढरीनाथ कांबळे वय ( ९० ) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखत निधन निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी अतिशय महाभयंकर कोरोना या आजारावरती त्यांनी मात केली होती प्रकृतीत सुधारणा असतानाही त्यांना बारामती येथील दवाखान्यात उपचार चालू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या पश्चत तीन मुले एक मुलगी नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.  भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आकाश कांबळे व रुई गावच्या मा. सरपंच रूपाली आकाश कांबळे यांच्या त्या आजी होत .    कै.हरूबाई पंढरीनाथ कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे करणार मजबूत संघटन .

इमेज
ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे करणार मजबूत संघटन . इंदापूर प्रतिनिधी महेश गडदे, जेष्ठ समाजसेवक मा.आण्णासाहेब हजारे यांनी पुन्हा एकदा राज्य स्तरावर मजबूत संघटन बांधणी करण्याचा विचार केला आहे ,विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावरती लोकशिक्षण लोकजागृती तसेच आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी दिनांक 18 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथे माजी जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती,  या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 262 तालुक्यात संघटन मजबूत करण्याचे काम केला आहे,सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून शिवाजी खेडकर यांची नियुक्ती केली असून शिवाजी खेडकर यांनी दिनांक 9स्पटेंबर 2021 रोजी पुणे येथे बैठक घेतली त्या जिल्हा बैठकीमध्ये तेरा तालुक्यांपैकी दहा तालुक्यांची तालुका संघटक म्हणून निवडी करण्यात आल्या,  त्यामध्ये इंदापूर तालुक्यात:जनार्धन पांढरमिसे यांची तालुका प्रमुख संघटक पदी निवड करण्यात आली आहे, आंदोलनाच्या माध्यमातून विविध समित्यांची नियुक्ती तालुका पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत केली जा...

राष्ट्रीय समाज पक्षाचा बावडा जिल्हा परिषद गटात महामेळावा

इमेज
  राष्ट्रीय समाज पक्षाचा बावडा जिल्हा परिषद गटात महामेळावा राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील 1000 शाखा ओपनिंग अभियानास पुणे जिल्हा इंदापुरातुन सुरुवात   इंदापूर; प्रतिनिधी: महेश गडदे, काल दिनांक . 10 सप्टेंबर 2021 रोजी श्री. माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, श्री. अजित दादा पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी, श्री. शाहिद भाई मुलाणी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडी प्रभारी व पुणे जिल्हा प्रभारी श्री. किरण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. सतीश नाना तरंगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्यातील शाखा ओपनिंग करण्यात आलेल्या नवनिर्वाचित खोरोची शाखा, खरात वस्ती शाखा, निरवांगी शाखा, रेडणी शाखा, बावडा शाखा आणि चाकाटी शाखा.  याबरोबरच भव्य रॅली काढण्यात आली आणि इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटामध्ये मेळावा यशस्वी पार पडला. या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इंदापूर तालुक्यातील सर्वच झेडपी पंचायत समितीच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असून  कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असे आवाहन पश्चिम महार...

श्री.सुनील धुरूपे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2021 प्राप्त

इमेज
 श्री.सुनील धुरूपे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2021 प्राप्त, प्रतिनिधि:दि.१०. महेश गडदे, रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मंगलदिनी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक सन्मान सोहळा थाटात संपन्न झाला. श्री.धुरूपे यांना उसतोड कामगार व मासेमारी मजुरांच्या मुलांच्या भरीव शैक्षणिक योगदानासाठी संस्थेने . महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारासाठी निवडलेल्या १५१ मानकऱ्यांना ऑनलाईन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. श्री. विजयकुमार शहा या ऑनलाईन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली.        श्री. धुरूपे हे इंदापूर तालुक्यातील ढूकेवस्ती केंद्र वरकुटे बु येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांचे ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक होत आहे.

सौ.सिंधू बनसोडे यांना साहित्य सेवा सन्मान पुरस्कार

इमेज
 सौ.सिंधू बनसोडे यांना साहित्य सेवा सन्मान पुरस्कार, प्रतिनिधी दि.१०.महेश गडदे. इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका नवोदित कवी, चारोळीकार व हायकूकार सौ.सिंधू रावसाहेब बनसोडे यांना मराठीचे शिलेदार समूह नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय 'मराठी साहित्य सेवासन्मान पुरस्कार' नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य लेखक दादाकांत धनविजय, उद्योजक सचिन गावखडकर, बेंजहबचे संचालक मयुर निमजे, डॉ. अनिल पावशेकर, साहित्यिक प्रा. आनंद मांजरखेडे, मीडिया पत्रकार रेणुका किन्हेकर, मराठीचे शिलेदार समूहाचे अध्यक्ष राहुल पाटील, अभिनेत्री प्राजक्ता खांडेकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ.बनसोडे ह्या भोडणी येथे प्राथमिक शिक्षिका असून त्यांनी एम ए (मराठी), डी. एड. डी. एस. एम. जी. डी. सी. ए. आदी पदव्या व आदी पदविका मिळवल्या आहेत.

अतुल झगडे विकासाचे अष्टपैलू नेतृत्व

इमेज
सरपंच कसा असावा? अतुल झगडे विकासाचे अष्टपैलू नेतृत्व .     प्रतिनिधि:महेश गडदे,     झगडे वाडी गावात शांत संयमी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे लहान पणीचे शिक्षण गावातील शाळेत झाले त्या नंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्याच काळात पितृ छत्र काळाने हिरावून नेले आणि घरातील सर्व जबाबदारी खाद्यावर आली अशातच मित्र मंडळी नातेवाईक सर्वांच्या मार्गर्शनाखाली व्यवसाय चालू केला तो नावारूपाला आणला हा अतुल यांच्या आयुष्यातील महत्वाचा दहा ते अकरा वर्षांचा टप्पा होता त्याच काळात जनते मधून गावचा सरपंच निवड सरकारने निर्णय केला व अतुल यांनी आपल्या सुविद्य पत्नी सौ रुपाली यांना जनतेतून बिन विरोध निवडून आणले आणि त्या नंतर गावात अनेक विकासाची कामे होण्यास सुरवात झाली आणि त्या मध्ये गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, पक्के रस्ते, मुरुमीकरण रस्ते, असे अनेक प्रकारचे रस्ते तयार करण्यात आले आणि आणखीन नवीन रस्ते तयार होत आहेत,  तसेच बंधिस्त गटारी, वेग वेगळ्या सरकारी योजना प्राधान्याने राबविण्यात येत आहेत, मा खासदार बारामती लोकसभा यांचा खासदार निधी विकासासाठी गावात आणला. तसेच गावात लाईट ची रात...

इंदापुरच्या मनिषा बंड यांना Edu लिडर पुरस्कार 2021 ने सन्मानीत..!

इमेज
  राज्यस्तरीय डिजिटल शैक्षणिक मासिक यांचे वतीने मनिषा बंड Edu लिडर पुरस्कार 2021 ने सन्मानीत..! प्रतिनिधि: महेश गडदे. दि ८ बदलत्या शैक्षणिक प्रवाहाचा वाटाड्या हे ब्रीद ध्येय संपूर्ण राज्यभर राज्यस्तरीय डिजिटल शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना edu लिडर २०२१ पुरस्कार वितरण शिक्षक भवन तळेगाव ढमढेरे येथे मासिकाचे मुख्य संपादक उमेध धावरे , संपादक पृथ्वीराज काळे , नामदेव पांचाळ , उपसंपादक सागर शिंदे , गणेश शिंदे यांचे हस्ते वितरण झाले. इंदापूर तालुक्यातून मनिषा बंड यांची निवड झाली. त्यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत पूरस्कार स्विकारला . इंदापूर तालुक्यातून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देता.आॕनलाईन , आॕनलाईन गृहभेटी , ओसरी शाळा , शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यात यशस्वी झालेल्या भिगवण शाळेच्या तंत्रस्नेही , गुणवंत शिक्षिका मनिषा बंड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक , सहकारी शिक्षक , विद्यार्थी , पालक , शिक्षक यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर कार्यकारिणीची फेरनिवड

इमेज
भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर कार्यकारिणीची फेरनिवड. इंदापूर (प्रतिनिधी महेश गडदे इंदापुर येथील डाॅ. आंबेडकरनगर मधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.      इंदापूर तालुक्यातील सर्व श्रामनेर, बौध्दाचार्य, केंद्रीय शिक्षक तथा विद्यमान सर्व पदाधिकारी तसेच इच्छुक पदाधिकारी यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे जिल्हा (पूर्व) अध्यक्ष रघुनाथ साळवे यांनी केले होते.         प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुर्वीची कार्यकारिणी बरखास्त करीत असल्याचे वरिष्ठांनी सूचित केले. कोरोना कालावधीत या कार्यकारिणीने उत्कृष्ट कामकाज केल्याने सर्वानुमते पूर्वीच्या कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली तर बौध्दाचार्य बाळासाहेब सरवदे यांची इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी एकमेव निवड करण्यात आली.       या बैठकीस महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव दिलीप सरोदे, पुणे जिल्हा पूर्व अध...

शिक्षक सेवेबरोबर स्वतःचे कलागुण जोपासणे काळाची गरज

इमेज
शिक्षक सेवेबरोबर स्वतःचे कलागुण जोपासणे काळाची गरज - केंद्र प्रमुख संभाजी आजबे.    किरण म्हेञे व सतिश भोंग यांचा सत्कार संपन्न.. प्रतिनिधि:महेश गडदे, दि. ७ व्याहाळी केंद्रातील वडापुरेवस्ती शाळेचे उपशिक्षक , शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा संचालक      श्री किरण म्हेञे यांनी मराठी साहित्य शिलेदार नागपूर यांचेकडून साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ,  शिंदेवस्ती शाळेचे शिक्षक श्री सतिश भोंग यांना आदर्श बहुजन टीचर्स यांचे तर्फे राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र प्रमुख संभाजी आजबे यांचे हस्ते फेटा , पुष्पहार , शाल , पेन , पुस्तक , नारळ देवून सन्मान करण्यात आला.                 प्रसंगी संभाजी आजबे यांनी शिक्षकांनी शिक्षक सेवा करत असताना आपले कलागुण जोपासून त्याचा उपयोग अध्यापनात करावा असे सांगितले ,  त्याचबरोबर दत्ताञय लकडे , किरण म्हेञे , सतिश भोंग , यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अतुल जौंजाळ , नंदकुमार सूर्यवंशी , गणेश लाळगे , बापूराव राऊत , चंद्रकांत रामाणे ,...

कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी.

इमेज
  कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी. क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करताना इंदापुर प्रतिनिधि-महेश गडदे, इंदापुर येथे कौठळी गावात क्रांतीवीर उमाजी नाईक संघटनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली  कोरोणाचं खुप मोठं संकट असल्यामुळे थोडक्या लोकांत जयंती साजरी करण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया इंदापूर तालुका अध्यक्ष श्री हामा पाटील उपस्थित होते , संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश भंडलकर, उपाध्यक्ष दैवत जाधव , खजिनदार नाना भंडलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,  ह.भ.प.विनायक महाराज जाधव, व चंदुलाल भंडलकर यांनी उमाजी नाईक यांच्याबद्दल प्रबोधन केले  या वेळी उपस्थित अंकुश भंडलकर, दत्तात्रेय भंडलकर,भोजलिंग माने, नामदेव पाटील,मल्हारी चव्हाण, राहुल खोमणे,जयभारत जाधव, कुमार भंडलकर, औदुंबर काळेल, साहेबराव जाधव,बारीकराव जाधव,लाला बोडरे, किशोर भंडलकर व अनेक युवक व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

श्रीमती सुप्रिया गेनबा आगवाने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

इमेज
  श्रीमती सुप्रिया गेनबा आगवाने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रतिनिधि :महेश गडदे, शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडनी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या शाळेतील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुप्रिया गेनबा आगवाने यांना SUPER 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार 2021या पुरस्काराने गौरवण्यात आले.  सदर पुरस्कार वितरण सोहळा बारामती तांबे नगर याठिकाणी मेडिकोज गिल्ड, भिकोबा तांबे सभागृह.एम. आय. डी.सी.,बारामती रविवार दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मेडीकोज गिल्ड, भिकोबा तांबे सभागृह, एम.आय.डी. सी.,बारामती येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्राध्यापक प्रज्ञा हरिश्‍चंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. Super 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार 2021 यामध्ये राज्यातून केवळ पाच प्राथमिक शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती...