इंदापूरातील शिक्षक:अरुण राऊत पाच वर्षापासुन दररोज देत आहेत गरिबांना जेवण

 इंदापूरातील शिक्षक:अरुण राऊत पाच वर्षापासुन दररोज देत आहेत गरिबांना जेवण.



प्रतिनिधि महेश गडदे,

जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून पुणे जिल्ह्यातील इंदापूर मधील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सहशिक्षक श्री.अरुण लक्ष्‍मण राऊत,त्यांच्या पत्नी सौ.वैशाली अरुण राऊत व त्यांची मुलगी अपेक्षा व मुलगा वैभव हे गेल्या पाच वर्षांपासून दररोज संध्याकाळी इंदापूर एस. टी. स्टँड मधील मुक्कामी असणाऱ्या गरजू , गोरगरीब व निराधार लोकांना स्वखर्चाने मोफत अन्नदान करत आहेत. दररोज संध्याकाळी१० ते १५ लोकांना मोफत जेवण देत आहेत.


29नोव्हेंबर 2016 रोजी शिक्षक अरुण राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रमास सुरुवात केला होता, तेव्हापासून पाच वर्ष झाली दररोज अन्नदानाचे पवित्र काम स्वखर्चाने करत आहेत,कोरोना काळामध्ये देखील त्यांनी अन्नदानाचे काम चालु ठेवले, त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन समाजातील काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत दिली, दररोज संध्याकाळी राऊत सरांची पत्नी सै वैशाली व मुलगी अपेक्षा दोघेजन जेवण बनवून देतात.सर अरुण राऊत आणि त्यांचा मुलगा वैभव दररोज सायंकाळी गरजू लोकांना इंदापूर मधील एस टी स्टँड व फुटपाथ वर जाऊन लोकांना जेवण देतात.

यावर्षी अन्नदानासाठी काही नागरिकांनी मदत केली आहे त्यापैकी सौ.मानसी संजय कुलकर्णी, श्री सुनील जोगळेकर, श्री भगवान विठ्ठल दळवी, श्री संजय चांदणे,श्री नवनाथ एकाड,सौ.वर्षा माणिक भोंग,सौ.विनया सतेश भोंग,डॉ. अमोल शेंडे,श्री संदीप (पिंटू शेठ) दोशी,श्री अरुण सातव.यांनी आर्थिक मदत केली आहे.


सामाजिक कामाची आवड असल्यामुळे अन्नदाना बरोबरच सर दरवर्षी आधार सेवा परिवाराच्या माध्यमातून इंदापुर तालुक्यातील काही विद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. अन्नदानाचे हे काम इथून पुढे आपल्या हातून घडावे अशी सहशिक्षक श्री अरूण लक्ष्मण राऊत यांची इच्छा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.