पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर कौठळी जि.प.प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा.

इमेज
इंदापूर कौठळी जि.प.प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा.   प्रतिनिधि:महेश गडदे.  आज दिनांक 26 नोव्हेंबर जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.प्रथम उपशिक्षिका आरती गायकवाड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.वाचना नंतर 26/11 च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिक व शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.  भारतीय संविधान दि. 26 नोव्हेंबर निमित्त संविधानाचा परिचय होऊन सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी जाणीव जागृती होणे तसेच संविधानातील मुलतत्त्वांचा प्रचार व प्रसार होणे या उद्देशाने माझे_संविधान_माझा_अभिमान या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले .त्यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.प्रभातफेरी काढून संविधाना विषयी जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे नियोजन नंदकुमार सूर्यवंशी, भारत ननवरे व आरत...

संविधान दिना निमित्त श्री बाबीर विद्यालाय रुई येथे संविधान वाचन केले.

इमेज
संविधान दिना निमित्त श्री बाबीर विद्यालाय रुई येथे संविधान वाचन केले. प्रतिनिधि:महेश गडदे.   रुई ता.इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात आज भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान वाचन घेण्यात आले.      विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांचे हस्ते पूजन करून 'माझे संविधान माझा अभिमान' हा उपक्रम शासनाने राबवण्याचे ठरवले आहे त्यादृष्टिकोणातून त्याचे महत्व विद्यार्थाना कळावे यासाठी भारतीय संविधानातील तत्वे,मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत,शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूल्य रुजवणं, विद्यार्थांना शालेय जीवनापासून संविधानातील मुळंतत्वां विषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी,अशा उद्देशातून ' माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.       यावेळी मा.मुख्याध्यापक यांनी संविधाना विषयी जनजागृती करून याचे महत्व विद्यार्थांना पटवून सांगितले,यावेळी संविधानाचे वाचन क्रीडा शिक्षक गौतम सोनवणे यांनी केले,यावेळी पर्यवेक्षक तानाजी मराडे,सर्व शिक्षक-शिक्षिका आणि कर्मचारी वृंद उप...

इंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..

इमेज
  इंदापूरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.. इंदापूर (प्रतिनिधी) : महेश गडदे. इंदापूर येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेतवन बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेदस प्रा.बाळासाहेब मखरे यांचे हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आला तर तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस प्रा.सुहास मखरे यांनी पुष्प अर्पण करुन दिप प्रज्वलन केले. सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.      ॲड. सुरज मखरे यांनी संविधानातील मजबूत अधिकार विषद करत संविधानाचे महत्व पटवून दिले.        यावळी पवन मखरे, अक्षय मखरे, दया मखरे, तुषार मखरे, सुहास मखरे, नागेश सोनवणे, सिद्धांत खरे, रोहित मखरे, सागर मखरे, उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले.  अक्षय मखरे यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे यांची प्रकृती ठणठणीत रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये...

इमेज
ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे यांची प्रकृती ठणठणीत रूटीन चेकअपसाठी रूबी हॉस्पिटलमध्ये... प्रतिनिधि:महेश गडदे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नाही. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनीधींकडून सातत्याने विचारणा होत असल्याने ही अधिकृत माहिती अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात येत आहे. आदरणीय अण्णा काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेले दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचे रूटीन चेकअप करण्यात आलेले नव्हते. काल डॉ. धनंजय पोटे व डॉ. हेमंत पालवे यांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर वयानुरुप पुढील तपासण्या रुबी हॉलला करण्याची सूचना केली. त्यानुसार अण्णांना आज विविध तपासण्या करण्यासाठी रुबी हॉल, पुणे येथे आणण्यात आले आहे. झालेल्या सर्व तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे डॉ. ग्रँट यांनी सांगितले आहे. कोणताही त्रास नसला तरी वयानूरूप प्रिकॉशन म्हणून डॉक्टरांनी एन्जिओग्राफी केली असून तेही रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. विश्रांतीसाठी आजची रात्र अण्णा रुग्णालयातच थांबतील. सकाळी उर्वरीत तपासण्या करून अण्णा राळेगणला परततील. अण्णांच्य...

व्याहाळी शाळेतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान.

इमेज
  व्याहाळी शाळेतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान. प्रतिनिधि: महेश गडदे, आज दिनांक २५/११/२०२१ रोजी व्याहाळी शाळेतील इयत्ता ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजी आजबे व उपस्थित शिक्षक बंधू भगिनींच्या हस्ते करण्यात आला.सन्मानाचे स्वरूप शाल,फेटा,श्रीफळ,पुस्तक, डायरी,पेन,हार असे होते. शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थी श्रेयशी सतीश भोंग,वेदांत सचिन गुधाटे, ओंकार अमोल भोंग,प्रेरणा सुभाष पवार,प्रज्वल गौतम चितारे या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका जयश्री मिसाळ यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसेच व्यहाळी केंद्रातील गडद शाळेचे मुख्याध्यापक गणेश लाळगे व अर्चना लाळगे मॅडम यांचा चि.राघव गणेश लाळगे याने देखील इयत्ता ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचा देखील सन्मान करण्यात आला सोबत व्याहाळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेबांनी उपस्थित मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी वेदांत गुधाटे ...

राळेगणसिद्धी येथील शिबिरात इंदापूर तालुका मोठ्या संख्येत सहभागी होणार.

इमेज
  राळेगणसिद्धी येथील शिबिरात इंदापूर तालुका मोठ्या संख्येत सहभागी होणार . इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे.  राळेगणसिद्धी येथे बुधवारी ( दि . २४ नोव्हेंबर ) रोजी होणाऱ्या शिबिरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत ,अनेक वर्षे भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासाच्या कमिट्या जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बरखास्त केल्या होत्या . परंतु पुन्हा एकदा  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कमिट्या सुरू करण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे.  बुधवार दिनांक २४ रोजी राळेगणसिद्धी येथे सकाळी १० ते ५ या वेळेत पुणे जिल्ह्यातील नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत . पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नवीन व जुने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत,  परंतु इंदापूर तालुक्यातुन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने राळेगणसिद्धी येथे  शिबिराला उपस्थित राहणार असल्याचे इंदापूर तालुक संघटक: जनार्दन पांढरमिसे, इंदापुर शहर संघटक: प्रशांत शिताप यांनी सांगितले.  ज्...

आज विदर्भ दौऱ्यादरम्यान चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद: शरदचंद्रजी पवार.

इमेज
  आज विदर्भ दौऱ्यादरम्यान चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद: शरदचंद्रजी पवार. प्रतिनिधी महेश गडदे,दि.१९.   स्थानिक प्रश्न जाणून घेण्यासाठी हा दौरा आहे. प्रश्न जाणून घेतल्यानंतर मुंबई किंवा दिल्लीत त्याची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.  जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थिती काय आहे हे पाहावे, पक्ष संघटनेची असो, राज्याची लोकांची असो, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांची असो, शेती, उद्योग, आदिवासी, दलित, उपेक्षित सर्व घटकांच्या स्थितीबाबत माहिती घ्यावी, यासाठी दौरा सुरू आहे. संसदेमध्ये मध्ये मी आहे, प्रफुलभाई आहेत. आमचे सहकारी महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. इथे येऊन आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेतले, जाणून घेतले. त्या प्रश्नांची मांडणी संसदेच्या व्यासपीठावर करून इथल्या भागाचे ओझे काही कमी करता येईल का हा या दौऱ्याच्या मागील हेतू आहे.  मला आनंद आहे की, गेले दोन-तीन दिवस मी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर येथे फिरत आहे. अनेक गोष्टी, अनेक लोक, अनेक शिष्टमंडळे भेटली. त्यांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांची मांडणी आमच्यासमोर केली आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्या...

हा विजय विरोधी पक्षाचा नसुन शेतकऱ्यांचा आहे: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.

इमेज
  हा विजय विरोधी पक्षाचा नसुन शेतकऱ्यांचा आहे: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. प्रतिनिधी महेश गडदे, राळेगण सिद्धी (अहमदनगर) :  केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही उभे केले होते. अखेर केंद्रातील भाजप सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन तीन कृषी कायदांचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विरोधकांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केले आहे. या परिस्थितीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केले आहे. अण्णा हजारे म्हणाले, कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतल्याची बातमी ऐकली. याचा आनंद झाला असून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी हजारे पुढे म्हणाले की, हा विजय विरोधी पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आ...

गरिबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून मिठाई वाटली: जनार्दन पांढरमिसे

इमेज
  गरिबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून मिठाई वाटली: जनार्दन पांढरमिसे . इंदापूर प्रतिनिधी महेश गडदे. गोरगरीबांच्या घरात दिवाळी साजरी व्हावी म्हणून मिठाई चे वाटप केले दुष्काळी भागातुन रोजगार मिळावा म्हणून इंदापुर तालुक्या च्या काही भागात ऊस तोड मजुर मोठ्या प्रमाण येत असतात ते आपल्या कुटूंबा सोबत लहान लहान मुलांना घेऊन दिवस भर उन्हात काबाड कष्ट करत असतात,अशा लोकांना त्यांच्या कोपीवर जाऊन मिठाई चे वाटप केले ,  श्रिमंतांना कोणीपण मोठ मोठे गिफ्ट देतात ,मिठाई चे मोठ मोठे बॉक्स देतात, परंतु गरिबांना मदत करणारे खुप कमी लोक आहेत, मिठाई वाटत असताना त्या लहान लहान मुलांच्या चहर्यावरील जो आनंद पहायला मिळतो त्या सारखे सुख दुसर कोठेच नाही,  आपन त्यांची भुक भागवू शकत नाही परंतु त्यांच्या चहर्यावर आनंद तरी आनू शकतो या संकल्पनेतुन मिठाई वाटपाचे कार्य केले असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका संघटक जनार्दन पांढरमिसे यांनी सांगीतले यावेळी रवी शिंदे त्यांच्या सोबत उपस्थित होते.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास अण्णासाहेब हजारे प्रणित कार्यकारणीची मासिक बैठकी संपन्न.

इमेज
  कळंब येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास अण्णासाहेब हजारे प्रणित कार्यकारणीची मासिक बैठकी संपन्न. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजलि अर्पित करताना, प्रतिनिधि महेश गडदे, इंदापूर कळंब येथे दि १४ नोव्हेंबर रोजी तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास अण्णासाहेब हजारे प्रणित ची बैठक ग्रामपंचायत कार्यालय कळंब मध्ये पार पडली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व आध्य क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पांजलि अर्पित करुण बैठकीला सुरवात करण्यात आली, तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार ,खजिनदार अनिल चितळकर, इंदापूर शहर संघटक प्रशांत भानुदास शिताप, सहसंघटक लक्ष्मण गडदेसर,तालूका सहसंघटक शामराव केशव जाधव, इंदापूर तालूका सचिव महेश मोहिते,व नौशाद पठाण मॅडम ऊपस्थित होते ...  यामध्ये २४ नोव्हेंबर रोजी राळेगण सिद्धी या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरासाठी लेखातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या कशी वाढेल या विषयावर चर्चा करण्यात आली,  इंदापूर तालुक्यात...

राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांना कडबनवाडी गावात प्रवेश बंदीचा निर्णय माघारी: माऊली चवरे.

इमेज
राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांना कडबनवाडी गावात प्रवेश बंदीचा निर्णय माघारी: माऊली चवरे. प्रतिनिधि महेश गडदे.   कडबनवाडी गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांनी शेळगांव कडबनवाडी रुई रस्ता अर्धवट काम झाले आहे. रस्त्याचे काम सुरू केले जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्याच्ये मा.श्री दत्तात्रय भरणे वनराज्यमंत्री यांना गावात येण्यास शेतकरी व ग्रामस्थ विरोध करणार होते. परंतु शासकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी लेखी स्वरूपात काम दिवाळी झाल्या नंतर कामाला सुरुवात करणार आहोत असे लेखी पत्र दिले त्यामुळे काही दिवस आम्ही जो निर्णय घेतला होता तो परत घेत आहोत. लेखी आश्वासन:मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये पॅकेज क्र . PUN ५४ अंतर्गत सदर काम सा.क्र . ०/०० ते ७/०० असे मंजूर असून सदर कामामध्ये काही लांबीत खडीकरण व MPM चे काम झालेले आहे . सा.क्र . ०/२५० ते ०/७५० या लांबीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या अडथळ्यामुळे व सा.क्र . ०/७५० ते ०/८१० मध्ये वनहद्द वाटप क्षेत्र ( गट क्र . ३० ९ , ३१० ) तसेच सा.क्र . १/३५० ते १/७७० ( गट क्र . २ ९९ ) वनहद्द वाटप क्षेत्र ( गट क्र . १८१ ) सा.क्र . ३ / ६२० ...