भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास अण्णासाहेब हजारे प्रणित कार्यकारणीची मासिक बैठकी संपन्न.
कळंब येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास अण्णासाहेब हजारे प्रणित कार्यकारणीची मासिक बैठकी संपन्न.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पांजलि अर्पित करताना,प्रतिनिधि महेश गडदे,
इंदापूर कळंब येथे दि १४ नोव्हेंबर रोजी तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास अण्णासाहेब हजारे प्रणित ची बैठक ग्रामपंचायत कार्यालय कळंब मध्ये पार पडली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व आध्य क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पांजलि अर्पित करुण बैठकीला सुरवात करण्यात आली, तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार ,खजिनदार अनिल चितळकर, इंदापूर शहर संघटक प्रशांत भानुदास शिताप, सहसंघटक लक्ष्मण गडदेसर,तालूका सहसंघटक शामराव केशव जाधव, इंदापूर तालूका सचिव महेश मोहिते,व नौशाद पठाण मॅडम ऊपस्थित होते ...
यामध्ये २४ नोव्हेंबर रोजी राळेगण सिद्धी या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरासाठी लेखातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या कशी वाढेल या विषयावर चर्चा करण्यात आली,
इंदापूर तालुक्यातून जास्तीतजास्त कार्यकर्ते यावेत या उद्देशाने सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे यावर भर देण्यासाठी चर्चा करण्यात आली, तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिबिरासाठी जास्त संख्या कसे वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे, गुरुवारपर्यंत नावाची यादी तयार करणे अपेक्षित ठेवले आहे,
सर्वांना राळेगण सिध्दी येथे शिबिरासाठी जायची व्यवस्था करण्यासाठी सगळ्यांनी नावांची यादी तालुका सहसंघटक जनार्धन पांढरमिसे व शहर संघटक प्रशांत शिताप यांच्याकडे पाठवीणे आवश्यक आहेे, त्यासाठी संपर्क:9766641002,+91 75885 95595,वर संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा