संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक संपंन्न ; पहिल्याच बैठकीत 48 अर्जांना मंजूरी .
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक संपंन्न ; पहिल्याच बैठकीत 48 अर्जांना मंजूरी . इंदापूर प्रतिनिधी-महेश गडदे, इंदापूर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची स्थापना झाल्यानंतर मंगळवार दि.29 रोजी इंदापूर तहसील कार्यालयात समितीची पहिली आढावा बैठक पार पडली.या पहिल्याच बैठकीत 48 लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली.तर 13 अर्ज अपात्र ठरवण्यात आले. या बैठकीस तहसलीदार अनिल ठोंबरे यांसह समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ, प्रहार अपंग संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, तालुकाध्यक्ष अनंतराव गायकवाड आदी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात सॅनिटायझर व मास्क वापरणे गरजेचे आहे या व्यापक कल्पनेतून तहसील कार्यालय इंदापूर कडून समितीचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ, सदस्य लक्ष्मण परांडे,महादेव लोंढे,आबासाहेब निंबाळकर, दत्तात्रय बाबर,अजय भिसे व महिला सदस्य रहेना मुलाणी यांचा गुलाबपुष्प ,सॅनिटायझर व मास्क देऊन सन्मान करण्यात आला. शासकीय योजनांच्या लाभासाठी एकूण 61 अर्ज प्राप्त आले होते. त्यापैकी 48 अर्ज मंजूर करण्यात आले.यात...