इंदापुर मुख्याध्यापक संघा धावला शिक्षक कै सचिन सुखदेव बोरकर यांच्या कुटुंबाच्या मदतीला,
इंदापुर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा धावला शिक्षक कै.सचिन बोरकर यांच्या कुटुंबाच्या मदतीला,
प्रतिनिधि- महेश गडदे,
इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना इंदापूर .
यांच्या मार्फत शिक्षक कै. सचिन सुखदेव बोरकर, श्री छत्रपती हायस्कूल परीटवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे कार्यरत होते.
कोरोना या आजाराने त्यांचे वयाच्या 31 वर्षी निधनं झाल्याने सर्व शिक्षक संघाला एक मोठा धक्काच बसला.
त्यांचे मागे त्यांची पत्नी श्रीमती किरण सचिन बोरकर, मुलगा सूरज बोरकर वय वर्ष 2 व अथर्व वय वर्ष 4 महिने असा परिवार आहे,
त्या कुटुंबा कडे पाहिल की आपोआप डोळ्यातुन धारा वाहु लागतील, लहान लहान मुलं त्यांना कोनाचाच आधार नाही,
एक शिक्षक आपल सर्व आयुष्य हे दुसर्या साठी वाहत असतो परंतु ज्या वेळी शिक्षकावर वेळ येते त्या वेळी समाज त्याच्यासोबत उभा राहत नाही ,
कै.सचिन सुखदेव बोरकर यांचे कोरोनाने निधन झाल त्यांच्या कुटुंबा मध्ये लहान लहान मुले आहेत त्यांच उभ आयुष्य पडल आहे कस जगायचं त्यांचा संभाळ कसा करायचा हे सर्व प्रश्न त्या लहान लहान मुलांच्या आईला पडले आहेत, समाज्याने पुढे येऊन त्या शिक्षकाच्या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा,
त्यांचे मूळ गाव करमाळा तालुक्यातील आहे .त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या दुःखात इंदापुर शिक्षक संघ सहभागी होऊन श्रीमती किरण सचिन बोरकर यांना शिक्षक संघातर्फे रोख रक्कम रुपये 10,000 ₹ देण्यात आली.
यावेळी संघाने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जमा केलेल्या कोवीड निधीतून रक्कम देण्यात आली आहे.
यासाठी या शाळेतील मनोहर पाटील सर यांचे सहकार्य लाभले. वरील रक्कम इंदापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री गणेश घोरपडे ,सचिव श्री जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष श्री जाधव सर व काळे सर यांचे उपस्थितीत अणि जिल्हा संघाचे उपाध्यक्ष श्री रामराव पाडुले यांचे मार्गदर्शनाखाली रक्कम देण्यात आली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा