आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

"आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

खडकी, देऊळगावराजे गटात आनंदाचे वातावरण..
मच्छिंद्र (आंण्णा) काळभोर यांनी ठोकले दंड !

Zee Maharashtra News..
(मुख्य संपादक श्री महेश गडदे.)

खिड़की. ता.०१: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवारांची खडकी, देऊळगावराजे गटात मांदियाळी पाहायला मिळत आहे.इच्छुक उमेदवारांनी या गटातील गावांमध्ये जाऊन गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. 
त्यातच "आपला माणूस" म्हणून परिचित असलेले आणि गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत बनलेले,सतत गोरगरिबांना मदत करणारे,गोरगरिबांच्या सुखदुःखात धाऊन जाणारे,मनमिळाऊ स्वभावाचा,सर्वांना आपला हक्काचा वाटणारा,आणि लग्न कार्याला आर्थिक मदत करणारा माणूस "आपला माणूस" असा त्यांच्या वरती शिक्का असणारा माणूस म्हणजे मच्छिंद्र (अण्णा) काळभोर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शड्डू ठोकला असून त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक खडकी,देऊळगावराजे गटातून लढवणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे खडकी गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.त्यांनी गावासह तालुक्यातील अनेक पदांवरती काम केले आहे,त्यांना राजकीय,सामाजिक,दांडगा अनुभव असून त्यांनी खडकी गावच्या उपसरपंच पदासह विकास सोसायटी चेअरमन,तंटामुक्ती अध्यक्ष,दौंड खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन,तसेच १९८५ पासून त्यांना सक्रिय राजकारणातील प्रदिर्घ अनुभव असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली. 

मच्छिंद्र काळभोर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की जर भारतीय जनता पक्षाने खडकी,देऊळगावराजे जिल्हा परिषद गटाची माझ्यावर जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे स्वीकारण्यास मी तयारआहे,त्यामध्ये मी कुठेच कमी पडणार नाही,माझा या गटात चांगला जनसंपर्क असल्याने मी जिल्हा परिषदेची निवडणूक सहज जिंकू शकतो,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर या गटात आयात उमेदवार दिला तर खडकी गावातील संपूर्ण मतदार माझ्या पाठीशी उभा राहील.

त्यामुळे माझा विजय निश्चित होईल असा त्यांनी ठामपणे विश्वास देखील व्यक्त केला,त्यामुळे भारतीय जनता पक्षाने माझा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मला उमेदवारी द्यावी अशी त्यांनी मागणी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा