इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.
'इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.
भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका पश्चिम मंडलाचे महामंत्री तानाजी मारकड शेळगाव पंचायत समिती गणातून इच्छुक आहेत काल उमेदवारीसाठी त्यांनी मुलाखत दिली, पक्षाच्या वरिष्ठांनी फॉर्म भरण्याची संकेत त्यांना दिलेले आहेत.
तानाजी मारकड गेली १२ वर्षांपासून वयाच्या २१ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत,राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ते चळवळीत राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय होते, इंदापूर तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा महत्त्वाच्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे ते संस्थापक/अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला 'भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाचे 'राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार व अनेक वेगवेगळे सन्मान कार्याच्या जोरावर प्राप्त झालेले आहे, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य शिक्षण अशा क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान आहे,
त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे.
'देशाच्या 'राष्ट्रीय मेरी माती, मेरा देश, ह्या कार्यक्रमामध्ये इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये केले आहे, त्यांनी सरकारच्या वतीने दूरदर्शन वाहिनीला ' मेरी माती, मेरा देश ह्या कार्यक्रमाची भूमिका मांडली आहे,
अशाप्रकारे शोषित, उपेक्षित, दुर्लक्षित, घटकांना केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्याने पंचायत समिती साठी मुलाखत दिली आहे,
पक्षाने संधी दिल्यास, त्याचं सोन करण्याची धमक त्यांच्यात आहे,अशी जनभावना रूई बाबीरनगरीसह परिसरातील लोकांच्यामध्ये आहे,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा