पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रा.डॉ.संजय चाकणे,भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे दिशादर्शक प्रशासक -डॉ.प्रकाश पांढरमिसे

इमेज
प्रा. डॉ. संजय चाकणे भारतीय उच्च शिक्षणाला दिशा देणारे दिशादर्शक प्रशासक - डॉ.प्रकाश पांढरमिसे. Zee  महाराष्ट्र न्यूज..( श्री.महेश गडदे. )            इंदापूर.ता.०१: भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेला आज जेव्हा गुणवत्तेची, नवोन्मेषाची आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वाची नितांत गरज आहे, तेव्हा काही व्यक्तिमत्त्वे केवळ प्रशासक म्हणून नव्हे, तर दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून समोर येतात. त्यापैकी प्राचार्य डॉ. संजय चाकणे हे असेच एक नाव आहे, ज्यांनी गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करताना अध्यापन, संशोधन, प्रशासन आणि समाजभान यांचा समन्वय साधत उच्च शिक्षणाला नवी दिशा दिली आहे.               डॉ. संजय चाकणे यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून येत शहरी शैक्षणिक विश्वात स्वतःची ठाम ओळख निर्माण केली आहे त्यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी प्रेरणा देणारा आहे. गेली ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अभ्यासू नेतृत्वाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तब्बल सात वर्षे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ...

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा

इमेज
माजी विद्यार्थी मेळाव्याला इ.आठवी ते दहावी च्या मुला मुलींनी लावली हजेरी.    Zee महाराष्ट्र न्यूज.✍️ महेश गडदे. इंदापूर .ता.२७: मेळाव्याची सुरवात श्री सरस्वती व स्व.आत्माराम पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पूजन मुखद्यापक श्री.जगन्नाथ पाटील सर व .श्री.आमरसिह पाटील आणि सर्व शिक्षक श्री सुनील दराडे, श्री धनाजी गावडे, श्री दादा निटवे श्री उस्मान मुलाणी श्री.बी बी मुलाणी, श्री आमिन मुल्ला श्री सोनवले सर श्री काळे सर श्री जाधवसर श्रीमती मिरादेवी यांच्या हस्ते झाले. सूत्र संचालन श्री अतुल बनसोडे यांनी केले.सर्व शिक्षक व मुले व मुलींचे स्वागत श्री सोमनाथ सनवले यांनी स्वतःलिहलेल्या श्री स्वामी समर्थ यांचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. मेळाव्या दरम्यान मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ पाटील यांनी माझी विद्यार्धी यांना मार्गदर्शन केले.ते म्हणलेकी, शिक्षण हे चगल्या प्रकारे स्वीकारले पाहिजे त्याचा उपयोग हा रोजच्या जीवनात झाला पाहिजे शिक्षण हे वागिनीचे दूध आहे ते जर पिले तर ते नखीच बळ दिल्याशिवाय राहणार नाही.ते आपल्या नव्या पिढीची प्रगतीच होणार. आता आम्ही ठरव...

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

इमेज
'इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड. भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका पश्चिम मंडलाचे महामंत्री तानाजी मारकड शेळगाव पंचायत समिती गणातून इच्छुक आहेत काल उमेदवारीसाठी त्यांनी मुलाखत दिली, पक्षाच्या वरिष्ठांनी फॉर्म भरण्याची संकेत त्यांना दिलेले आहेत. तानाजी मारकड गेली १२ वर्षांपासून वयाच्या २१ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत,राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ते चळवळीत राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय होते, इंदापूर तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशा महत्त्वाच्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे ते संस्थापक/अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेला 'भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयाचे 'राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार व अनेक वेगवेगळे सन्मान कार्याच्या जोरावर प्राप्त झालेले आहे, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य शिक्षण अशा क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान आहे,  त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. 'देशाच्या '...

रुई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ॲड. सुप्रिया अमरसिंह मारकड.

इमेज
रुई बाबीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड. Zee Maharashtra News. (मुख्य संपादक - महेश गडदे.) इंदापूर.ता.१५: महाराष्ट्र राज्यामध्ये तिर्थक्षेत्र बाबीर देवस्थान मुळे प्रसिद्ध असलेल्या रुई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुर्वीचे सरपंच नयना पाटील यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ॲड मारकड यांचा एकमेव अर्ज आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी शेळके मॅडम यांनी मारकड यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. विद्यमान सरपंच महिला व उपसरपंच महिला झालेने मारकड यांचे निवडीनंतर खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन महिलाराज आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. निवडीनंतर सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, हरिकाका माने, कुमारशेठ माने यांनी सन्मान केला यावेळी सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर मारकड यांनी मा.सभापती प्रविणभैय्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीन विकासासाठी कायम प्रयत्नशील व कटिबद्ध राहुन व विकासकामांसाठी प्...

डॉ. राधिका शहा यांचे निधन.

इमेज
तत्पूर्वी अवयवदान केल्याने सहा जणांना मिळाले जीवदान. Zee  महाराष्ट्र न्यूज.. इंदापूर.ता.१४: इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका संदेश शहा ( वय ५५ ) यांचे दिनांक १२ जानेवारी रोजी रात्री ११.४८ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, सासू, पती, दोन मुली व एक मुलगा, दीर, जाऊबाई, दोन पुतणे, एक पुतणी असा परिवार आहे. त्यांनी मरणोत्तर नेत्र, ह्दय, किडनी, लिव्हर दान करून सहा जणांना जीवदान दिले. त्यामुळे त्या आपल्यामध्ये नसल्यातरी अवयवदान रूपाने त्या जिवंत आहेत. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपाध्यक्ष मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिता मुकुंद शहा, नगराध्यक्ष भरत शहा यांच्या सह त्यांनी सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी ही तीन गावे टँकर मुक्त करण्यासाठी इंदापूर रोटरी क्लब ला सकाळ तनिष्का म्हणून ...

डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार.

इमेज
भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार २०२५ डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना सन्मान. Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर.ता.११:  खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त), खडकी,पुणे येथे इतिहास विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणारे इतिहास संशोधक व समाजभान, सामाजिक बांधिलकी जपणारे प्राध्यापक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना “भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार २०२५” आझम कॅम्पस पुणे येथे दि. 11 जानेवारी, 2026 रोजी क्रांत्रिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हाजी शहीद कादरी, आजम कॅम्पसच्या अध्यक्षा डॉ.अबिदा इनामदार, हनुमंत चव्हाण, सतीश वाघमारे, मुस्तफा सैद्द या मान्यवरांचा उपस्थित प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक व राष्ट्रउभारणीच्या कार्याचा हा सन्मानपूर्वक गौरव असून, या पुरस्कारामुळे खडकी शिक्षण संस्थेसह संपूर्ण शैक्षणिक विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. प्रकाश पांढरमिसे हे इंदापूर तालुक्यातील रुई (बाबीर) थोरातवाडी गावातील सर्वसामान्य शेतकरी ...