रुई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ॲड. सुप्रिया अमरसिंह मारकड.
रुई बाबीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड.
Zee Maharashtra News.
(मुख्य संपादक - महेश गडदे.)
इंदापूर.ता.१५: महाराष्ट्र राज्यामध्ये तिर्थक्षेत्र बाबीर देवस्थान मुळे प्रसिद्ध असलेल्या रुई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ॲड सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुर्वीचे सरपंच नयना पाटील यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ॲड मारकड यांचा एकमेव अर्ज आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी शेळके मॅडम यांनी मारकड यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
विद्यमान सरपंच महिला व उपसरपंच महिला झालेने मारकड यांचे निवडीनंतर खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन महिलाराज आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. निवडीनंतर सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, हरिकाका माने, कुमारशेठ माने यांनी सन्मान केला यावेळी सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर मारकड यांनी मा.सभापती प्रविणभैय्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीन विकासासाठी कायम प्रयत्नशील व कटिबद्ध राहुन व विकासकामांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा