पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

“निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”

इमेज
“ निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”     Zee महाराष्ट्र न्यूज . (महेश गडदे.) पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जनतेच्या मनात घर करून राहिलेले आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नव्हे; तो ग्रामीण विकासाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा स्मरणदिन आहे. नेतृत्व हे केवळ पदावरून मोजले जात नाही. ते लोकांच्या विश्वासातून आणि कृतीतील सातत्यातून सिद्ध होते.याचा प्रत्यय नानांच्या आजवरच्या वाटचालीतून वारंवार येतो.         बारामती तालुक्यातील निरा-वागज या मातीतून घडलेले नाना पाटील हे त्या भूमीचे संस्कार, कष्ट आणि जिद्दीचे प्रतीक आहेत. शेतकऱ्यांच्या आशा, शेतमजुरांच्या संघर्ष आणि ग्रामीण समाजाच्या स्वप्नांना त्यांनी आपल्या कार्यातून दिशा दिली. म्हणूनच “निरा वागज हे गाव नानाचे गाव” ही भावना घोषवाक्यापुरती मर्यादित राहत नाही तर ती लोकांच्या मनातील श्रद्धा ठरते.         लोकनेते अजित पवार (अजितदादा) यांच्या विश्वासू स...

आता तो रुतबा नाही, तो दरारा नाही…” बारामतीच्या आवाजाची पोकळी - डॉ. प्रकाश पांढरमिसे.

आता तो रुतबा नाही, तो दरारा नाही…” बारामतीच्या आवाजाची पोकळी - डॉ. प्रकाश पांढरमिसे.           Zee  महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे) इंदापूर.ता.०४: “आता तो रुतबा नाही, तो दरारा नाही, तो बारामतीचा आवाज नाही; राजकारणात कित्येक येथील नेते आहेत, पण अजित दादांसारखा दुसरा कोणीही नाही…!”             ही ओळी केवळ एका नेत्याविषयीची भावनिक हाक नाही; ती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीची कबुली आहे. ही पोकळी एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीची नसून, एका राजकीय शैलीच्या, एका ठाम आवाजाच्या आणि एका निर्भीड नेतृत्वाच्या लोपाची आहे. ‘Miss you दादा…’ हे उद्गार जितके वैयक्तिक वाटतात, तितकेच ते सार्वजनिक मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करतात.               अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ सत्तास्थानाशी जोडलेले नव्हते; ते निर्णयक्षमता, प्रशासकीय पकड आणि स्पष्टतेचे प्रतीक होते. बारामतीचा आवाज हा भौगोलिक नव्हता. तो राज्यव्यवस्थेच्या केंद्रापर्यंत पोहोचणारा, अनेकदा अस्वस्थ करणारा; पण दुर्लक्षित करता ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे प्रेरणादायी कार्य – डॉ. प्रकाश पांढरमिसे.

इमेज
“ न्याय, नीतिमत्ता आणि लोककल्याणाचा आदर्श राजधर्म” : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे प्रेरणादायी कार्य – डॉ. प्रकाश पांढरमिसे.               Zee महाराष्ट्र न्यूज.(महेश गडदे) इंदापूर.ता.०३: राजसत्ता ही वैभवासाठी नव्हे, तर प्रजेच्या कल्याणासाठी असते, हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य भारतीय इतिहासातील एक तेजस्वी पर्व असल्याचे प्रतिपादन टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त) खडकी येथील इतिहास विभागप्रमुख, ऐतिहासिक व सामाजिक अभ्यासक, व्याख्याते डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध – पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.         कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपप्रचार्य डॉ. संदीप ननावरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात आढावा घेतला. “इतिहासातील स्त्री सत्ताधीश म्हणून अहिल्यादेवी होळकर या केवळ प्रशासक नव्हत...

अजितदादांकडून सहकार चळवळीला मोठी मदत-हर्षवर्धन पाटील.

इमेज
___________________________ शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा कारखान्यावरती श्रद्धांजली सभेत बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. • नीरा भीमा कारखान्यावरती श्रद्धांजली सभा  इंदापूर.दि.०२: राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यातून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, अशी अजितदादांची भूमिका होती. त्याचबरोबर अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार चळवळीला कायम सहकार्य केले. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यामुळे सहकार चळवळीचे नुकसान झाल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 2) व्यक्त केले.         शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणेसाठी आयोजित शोकसभेत हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले,अजितदादा यांना राज्यातील सर्वच विषयांचा अभ्यास होता. त्यांनी राज्यातील कृषी-प्रक्रिया उद्योगाच्या बळकटीकरणासाठी सातत्याने काम केले. साखर उद्योगाला सहकार्य करण्याची त्यांची सातत्याने भूमिका होती. समाजातील सर्व...