ज्ञानाचा ज्ञानदीप, नेतृत्वाची यशस्वी वाट: ज्ञानसूत प्राचार्य डॉ. संजय चाकणे”- डॉ. प्रकाश पांढरमिसे.
ज्ञानाचा ज्ञानदीप, नेतृत्वाची यशस्वी वाट: ज्ञानसूत प्राचार्य डॉ. संजय चाकणे”-डॉ. प्रकाश पांढरमिसे Zee महाराष्ट्र न्यूज.(महेश गडदे). पुणे.ता.३०: शिक्षणसंस्था ही केवळ ज्ञान देणारी जागा नसून, ती समाजाच्या विचारविश्वाची पायाभरणी करणारी आणि भविष्यातील नागरिक घडवणारी एक जिवंत प्रयोगशाळा असते. या प्रयोगशाळेला दिशा देणारा, तिच्या प्रवाहाला आकार देणारा आणि तिच्या गुणवत्तेला उत्तुंग उंची देणारा केंद्रबिंदू म्हणजे खडकी शिक्षण संस्थेचे,टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी पुणे येथे कार्यरत असणारे उपक्रमशील प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपल्या भूमिकेला केवळ प्रशासकीय चौकटीत मर्यादित न ठेवता, तिला मूल्याधिष्ठित, दूरदृष्टीपूर्ण आणि परिवर्तनवादी नेतृत्वाचे स्वरूप दिले आहे. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय म्हणजे टी. जे. कॉलेज या महाविद्यालयास नॅक अ ग्रेड,लगेच ऑटोनॉमस कॉलेज बनिविले, विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातील १२ ऑटोनॉमस आणाऱ्या महाविद्यालयाच्या पंगतीत टी. जे. महाविद्यालयास नेहून बसविले. हे त्यांनी अतिशय कल्पकतेने व परिवर्तनाच्या दिशे...