इंदापूर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाचे लक्ष वेधून घेणारा आश्वासक युवा चेहरा श्रीराज भरणे.
इंदापूर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाचे लक्ष वेधून घेणारा आश्वासक युवा चेहरा श्रीराजभैया भरणे”- डॉ. प्रकाश पांढरमिसे Zee महाराष्ट्र न्यूज. ( महेश गडदे) “माणुसकीच्या वाटेवर चालणारा दीप हवा, जनतेच्या वेदनांना समजणारा जीव हवा… राजकारणाला समाजकारणाची जोड देणारा, इंदापूरच्या मातीत असा तरुण नेता हवा…!” महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांची ओळख केवळ राजकीय वारशामुळे मर्यादित राहत नाही तर त्यांच्या कार्यातून, लोकांशी असलेल्या आपुलकी,आपलेपणा व आत्मीय नात्यातून आणि समाजासाठी असलेल्या सामाजिक बांधिलकीतून त्यांना स्वतंत्र स्थान प्राप्त होते. इंदापूर तालुक्यात आज अशाच एका अभ्यासू, संयमी आणि आश्वासक युवा चेहरा असणाऱ्या युवा नेतृत्वाची चर्चा सर्वत्र होताना दिसते आणि ते नाव म्हणजे बोरी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्रीराजभैया भरणे. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून जनमानसात विशेष लोकप्रिय ओळख निर्माण केलेले ना. दत्तात्रय भरणे मामा ...