इंदापूर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाचे लक्ष वेधून घेणारा आश्वासक युवा चेहरा श्रीराज भरणे.

इंदापूर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाचे लक्ष वेधून घेणारा आश्वासक युवा चेहरा श्रीराजभैया भरणे”-  डॉ. प्रकाश पांढरमिसे

Zee  महाराष्ट्र न्यूज. ( महेश गडदे)

“माणुसकीच्या वाटेवर चालणारा दीप हवा,
जनतेच्या वेदनांना समजणारा जीव हवा…
राजकारणाला समाजकारणाची जोड देणारा,
इंदापूरच्या मातीत असा तरुण नेता हवा…!”
         
महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांची ओळख केवळ राजकीय वारशामुळे मर्यादित राहत नाही तर त्यांच्या कार्यातून, लोकांशी असलेल्या आपुलकी,आपलेपणा व आत्मीय नात्यातून आणि समाजासाठी असलेल्या सामाजिक बांधिलकीतून त्यांना स्वतंत्र स्थान प्राप्त होते. इंदापूर तालुक्यात आज अशाच एका अभ्यासू, संयमी आणि आश्वासक युवा चेहरा असणाऱ्या युवा नेतृत्वाची चर्चा सर्वत्र होताना दिसते आणि ते नाव म्हणजे बोरी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्रीराजभैया भरणे.
           
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून जनमानसात विशेष लोकप्रिय ओळख निर्माण केलेले ना. दत्तात्रय भरणे मामा यांच्या संस्कारांचा आणि जनसेवेच्या परंपरेचा वारसा लाभलेल्या श्रीराजभैया भरणे यांनी अत्यंत शांत, लोकाभिमुख आणि विकासकेंद्री कार्यपद्धतीतून स्वतःची स्वतंत्र ओळख इंदापूर तालुक्यात निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आज इंदापूर तालुक्यातील विद्यार्थी, युवक, खेळाडू, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि अपेक्षेची भावना निर्माण होताना दिसत आहे.
“वारसा फक्त नावाचा नसतो,
तो विचारांचा आणि संस्कारांचा असतो…
जनतेसाठी झटणारा प्रत्येक श्वास,
खऱ्या नेतृत्वाचा आधार असतो…!”
          
राजकारण हे केवळ सत्ता किंवा पदापुरते मर्यादित नसून ते समाजकारणाशी जोडले गेले पाहिजे, ही भूमिका श्रीराजभैया भरणे यांच्या कार्यातून स्पष्टपणे जाणवते आहे. इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या समजून घेणे, युवकांना दिशा देणे, शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणे या माध्यमातून त्यांनी समाजाशी असलेली नाळ अधिक घट्ट केली आहे.विशेष म्हणजे “कै.भगवान भरणे प्रतिष्ठान”च्या माध्यमातून सुरू असलेले विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम हे भरणे कुटुंबीयांच्या समाजाभिमुख कार्याचे प्रेरणादायी प्रतीक ठरत आहेत. समाजातील गरजू घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम सातत्याने इंदापूर तालुक्यातील गावागावात राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळत आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हीच गरज ओळखून कै.भगवान भरणे प्रतिष्ठानने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे. अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाल्याने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे.

“ज्ञानाची ज्योत तेवत राहावी,
गरीबांच्या स्वप्नांना पंख मिळावेत…
शिक्षणाच्या प्रत्येक वाटेवर,
मदतीचे हात सोबत असावेत…!”
          
आरोग्य क्षेत्रातही कै.भगवान भरणे प्रतिष्ठानचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्रतपासणी मोहीम, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच आरोग्य जनजागृती अभियान यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते. अनेक कुटुंबांना कठीण प्रसंगी मदतीचा आधार देण्याचे काम या प्रतिष्ठानमार्फत केले जात आहे. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य घटकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर क्रीडा, सांस्कृतिक आणि युवकविकासाशी संबंधित विविध कार्यक्रमांनाही या कै.भगवान भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, त्यांना व्यासपीठ मिळावे आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे युवकांमध्ये श्रीराजभैया भरणे यांच्याविषयी आत्मीयता आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ होताना दिसते आहे.
                 
आजच्या राजकारणात प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. श्रीराजभैया भरणे यांनी याच कार्यपद्धतीचा स्वीकार करत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका कायम ठेवली आहे. एखाद्या गावातील पाणीप्रश्न असो, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असोत, विद्यार्थ्यांच्या समस्या असोत किंवा सामाजिक प्रश्न या प्रत्येक विषयाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची त्यांची वृत्ती लोकांना भावत आहे. लोकांमध्ये ती लोकप्रिय ठरत आहे.

“सत्ता येते आणि जाते,
पदांचाही प्रवास थांबतो…
परंतु जनतेच्या मनामध्ये,
सेवेचा ठसा मात्र कायम राहतो…!”
        
ना. दत्तात्रय भरणे मामा यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी जलसंधारण, शेती, सिंचन, शिक्षण, रस्ते आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून मोठे योगदान दिले. त्याच विकासदृष्टीचा वारसा पुढे नेताना श्रीराजभैया भरणे यांच्या कार्यातही विकासाभिमुखता स्पष्टपणे जाणवते. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि समाजातील तळागाळातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.राजकारणात संयम, संवाद आणि विश्वास या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. श्रीराजभैया भरणे यांच्या व्यक्तिमत्त्वात या तिन्ही गुणांचा समतोल दिसून येतो. सामान्य कार्यकर्त्यांशी साधेपणाने संवाद साधणे, युवकांना प्रेरणा देणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली लक्षवेधी ठरत आहे.
          
इंदापूर तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि विकासाच्या दृष्टीने संवेदनशील तालुका मानला जातो. अशा तालुक्यात नव्या पिढीचे नेतृत्व अभ्यासू, लोकाभिमुख आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले असणे गरजेचे आहे. श्रीराजभैया भरणे यांच्याकडे पाहताना हीच अपेक्षा आज इंदापूर तालुक्यातील अनेकांच्या मनात निर्माण होताना दिसते आहे.

“तरुणाईच्या डोळ्यांमध्ये स्वप्न नवे उजळावे,
विकासाच्या वाटेवर गावागावांनी पुढे यावे…
समाजकारणाच्या विचारातून नेतृत्व घडावे,
आणि इंदापूरचे भविष्य अधिक सक्षम व्हावे…!”
          
 भविष्यातील राजकारण हे विकास, सामाजिक बांधिलकी आणि लोकविश्वास या तीन आधारस्तंभांवर उभे राहणार आहे. त्या दृष्टीने श्रीराजभैया भरणे यांचे कार्य हे इंदापूर तालुक्यासाठी नव्या आशेचा किरण ठरत आहे. कै.भगवान भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरणे परिवाराचे सुरू असलेले समाजोपयोगी उपक्रम, लोकांशी असलेली आत्मीयता आणि विकासाची भूमिका यामुळे ते आगामी काळात इंदापूर तालुक्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी युवा नेतृत्व म्हणून उदयास येतील, अशी भावना आज सर्वसामान्य जनतेत व्यक्त होत आहे.
“जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे हात हवेत,
समाजासाठी झटणारे विचार हवेत…
इंदापूरच्या मातीतून उगवणाऱ्या नव्या नेतृत्वाला,
विकासाचे तेजस्वी उद्याचे आशीर्वाद हवेत…!”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा