इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई.
पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी टुव्हिलर चोरांच्या आवळल्या मुसक्या. Zee Maharashtra News... इंदापूर वार्ताहर... इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहरातील बाबा चौकातून दोन दुचाकीचोरांना ताब्यात घेतलेय.सलीम महबूब आणि नितीन सखाराम हरिहर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावचे रहिवासी आहेत. इंदापूर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 80 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार चव्हाण, अंकुश माने,सूरज गुंजाळ, विनोद लोखंडे, योगेश करचे यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. याच दरम्यान इंदापूर शहरातील बाबा चौकात पोलिसांच्या पथकाला दोन व्यक्ती दुचाकी वर संशयित रित्या फिरताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरच्या दोन दुचाकी या चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी अधिक तपास केला असता सदरच...