इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई.


पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी टुव्हिलर चोरांच्या आवळल्या मुसक्या.

Zee Maharashtra News...
इंदापूर वार्ताहर...

इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहरातील बाबा चौकातून दोन दुचाकीचोरांना ताब्यात घेतलेय.सलीम महबूब आणि नितीन सखाराम हरिहर अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावचे रहिवासी आहेत. इंदापूर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 80 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार चव्हाण, अंकुश माने,सूरज गुंजाळ, विनोद लोखंडे, योगेश करचे यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. 

याच दरम्यान इंदापूर शहरातील बाबा चौकात पोलिसांच्या पथकाला दोन व्यक्ती दुचाकी वर संशयित रित्या फिरताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरच्या दोन दुचाकी या चोरी केल्याचे कबूल केले. 

पोलिसांनी अधिक तपास केला असता सदरची दुचाकी ही इंदापूर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचा तपासात निष्पन्न झालं. तर दुसरी दुचाकी ही भिगवन पोलीस ठाण्याचा दाखला असलेल्या गुन्ह्यातील असल्यासही तपासात समोर आलं. पोलिसांनी हा 80 हजार रुपये किमतीचा मध्यमात ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. 

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, जीवन मोहिते, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तुषार चव्हाण, सुरज गुंजाळ,अंकुश माने, विनोद लोखंडे ,योगेश करचे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा