तीन लाखांचे दागिने केले परत, या प्रमाणिक पणाचे कौतुक - अविनाश मोहिते.

तीन साडेतीन लाखांचे दागिने केले परत ,या प्रमाणिक पणाचे केले कौतुक- अविनाश मोहिते.

निमसाखर येथे कुंडलिक घोडे यांचा सन्मान करताना अविनाश मोहिते व इ. पदाधिकारी.

Zee महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे.)

इंदापूर.ता.३०: दि.२४ एप्रिल २०२६. रोजी निमसाखर बस स्थानक येथे पुनम मारूती  बरकडे, रेडणी.या प्रवासी महिलेची बॅग विसरली होती, ती बॅग त्या महिलेस निमसाखर येथील न्यू ‌साईराज अँड कोल्ड्रिंक्स चे सर्वेसर्वा व मा.ग्रामपंचायात सदस्य श्री.कुंडलिक तुकाराम घोडे यांनी प्रामाणिकपणे परत केली, ती बॅग परत करत असताना त्या महिलेला अतिशय आनंद झाला, कारण  त्या बॅगेमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये चे किमतीचे दागिने होते,  ही बातमी समजताच, इंदापूर तालुका भाजपा चिटणीस अविनाश मोहिते, यल्लाप्पा देवकुळे, बाळासाहेब घोडे, पवन तोडकर, पोपट शेळके, यांनी निमसाखर येथे त्यांचा हॉटेल न्यू साईराज अँड कोल्ड्रिंक्स या हॉटेलमध्ये भेट देऊन त्यांचे कौतुक केले, मातंग समाज हा खुप प्रमाणिक व विश्वासु आहे, याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ने असे निस्वार्थ कार्य केले पाहिजे, त्यांच्या या कामगिरीबद्दल कुंडलिक घोडे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले, या वेळी भारतीय जनता पार्टीचे पं मंडळ चे चिटणीस अविनाश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते यलप्पा देवकुळे, गणेश घोडे, तानाजी मोहिते , बाळासाहेब घोडे, पवन तोडकर, पोपट तोडकर , राजाभाऊ खिलारे, नितीन खिलारे, विनायक घोडे, समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या