श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!
Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर - महेश गडदे. इंदापूर.ता.०१: संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान इंदापूर रुई येथील श्री बाबीर देवाचा यात्रा महोत्सव शनिवार (दि.०२) पासून प्रारंभ होणार आहे. यांत्रेची सांगता सोमवार (दि.०४) होणार आहे. ऑक्टोंबर शुक्रवार (दि.२५) सकाळी ११ वा बाबीर देवाची घटस्थापना देवाचे मानकरी आप्पा थोरात व मधु थोरात यांच्या हातून झाली. बाबीर देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र सह देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रुई ग्रामपंचायत व देवस्थान कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी हजेरी लावणारा आहेत अशी माहिती बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध ठिकाणाहून लाखो भाविक येतात सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे बाबीर देवाच्या दर्शनासाठी इंदापूरसह राज्यभरातील मोठ मोठे दिग्गज व राजकीय नेते मंडळी यात्रेमध्ये हजेरी लावून बाबीर देवाचे दर्शन घेणार...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा