स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.

अपक्ष उमेदवार प्रविण माने यांना स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिति (दिल्ली) यांचा पाठींबा.

 Zee Maharashtra News. mahesh gadade.


इंदापूर.ता.१४: इंदापुर -२०० विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रविन (भैया) माने यांनी राजकारण व समाजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे व सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धाऊन जानारे एक युवा नेतृत्व म्हणून जनसामान्यात त्यांनी आपली एक वेगळी प्रतीमा तयार केली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिति (दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रेय मांजरेकर यांच्या आदेशावरुन इंदापूर विधानसभेचे परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
 इंदापुर तालुक्याच्या वतीने स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेयर समिति (दिल्ली) यांच्या कडुन समिति चे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागरभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन विकास आघाडीचे उमेवार प्रवीण (भैया) माने तसेच पदाधिकारी यांच्या असंख्य कार्यकरत्यांच्या उपस्थितीत जाहिर पाठींबा देण्यात आला

 त्या वेळी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेयर समिति (दिल्ली) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत जाविर हे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकरते पांडुरंग कुंभार, माहिती अधिकार पत्रकार संघाचे इंदापुर तालुका कार्याध्यक्ष सतिष किर्दक, युवा नेते गणेश गेजगे आदि मान्यवर तसेच कार्यकरते देखील मोठ्या संखेने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील