श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!
Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर - महेश गडदे.
इंदापूर.ता.०१: संपूर्ण महाराष्ट्र सह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान इंदापूर रुई येथील श्री बाबीर देवाचा यात्रा महोत्सव शनिवार (दि.०२) पासून प्रारंभ होणार आहे. यांत्रेची सांगता सोमवार (दि.०४) होणार आहे. ऑक्टोंबर शुक्रवार (दि.२५) सकाळी ११ वा बाबीर देवाची घटस्थापना देवाचे मानकरी आप्पा थोरात व मधु थोरात यांच्या हातून झाली. बाबीर देवाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र सह देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी रुई ग्रामपंचायत व देवस्थान कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
यात्रेमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी हजेरी लावणारा आहेत अशी माहिती बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली आहे. बाबीर देवाच्या यात्रेमध्ये विविध ठिकाणाहून लाखो भाविक येतात सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे बाबीर देवाच्या दर्शनासाठी इंदापूरसह राज्यभरातील मोठ मोठे दिग्गज व राजकीय नेते मंडळी यात्रेमध्ये हजेरी लावून बाबीर देवाचे दर्शन घेणार आहेत.
यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत व देवस्थान कडून सर्व तयारी करण्यात आली आहे. देवस्थान परिसरातील सर्व पाण्याच्या टाक्यांचे शुद्धीकरण केले आहे. ग्रामपंचायत कडून मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे. पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध केले आहे. महावितरणाकडून मंदिर परिसरात व पालेवाल्यांसाठी विजेची सोय करण्यात आले आहे. महावितरण कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. आरोग्य विभागकडून आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत.
अशी असणार बाबीर देवाची यात्रा !
नोव्हेंबर शनिवार (दि.०२) दिपावली पाडवा या दिवशी सकाळी बाबीर देवाची पालखी रुई गावातून पारंपारिक वाद्यांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थिती मंदिराकडे प्रस्थान करेल. त्यानंतर देवस्थान, भगत मंडळी व मानकरी यांच्या हस्ते घट उद्यापन व बाबीर देवाच्या स्वयंभू मूर्तीचा दुग्धाभिषेक व महापूजा होईल.
रविवार (दि.०३) ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते ते भाविक या दिवशी देवाच्या नवसाची परतफेड करतात. त्यानंतर धनगर समाजाचे पारंपारिक नृत्य, गजे ढोल स्पर्धा होणार आहे. अमोल भिसे मित्रपरिवार गेली २५ वर्ष गजे ढोल स्पर्धा आयोजित करत आहे. करमणुकीसाठी सायंकाळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे.
सोमवार (दि.०४) पकाळणी व देवाची भाकणुक होईल, ही भाकणुक राज्यभर प्रसिद्ध आहे. त्यानंतर नवसाची बगाडे देण्याचा कार्यक्रम होईल.
२) दिग्गज नेते मंडळींची उपस्थिती !
खा.सुप्रियाताई सुळे, आ.दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राम शिंदे, आ.गोपिचंद पडळकर, आ.यशवंत माने, माजी आ.भानुदास मुरकुटे, पुणे जिल्हापरिषदचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, उपस्थित राहणार आहेत.
यात्रेसाठी सुमारे ९० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. बॅनर फ्लेक्सला परवानगी नाही. अवैध धंदे व चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
- राजकुमार डुणगे- सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंदनगर.
बाबीर देवाची घटस्थापना करताना देवस्थान व मानकरी आप्पा थोरात व मधु थोरात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा