बारामतीत क्लायबिंग वाॅल करण्याची अजितदादा पवार यांच्याकडे बारामती ट्रेकर्स क्लबची मागणी,

 बारामतीत क्लायबिंग वाॅल करण्याची अजितदादा पवार यांच्याकडे बारामती ट्रेकर्स क्लबची मागणी,



बारामती येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बारामती तांदुळवाडी येथे प्रस्तावित उद्यानामध्ये.

प्रतिनिधी :महेश गडदे

 क्लायबिंग वाॅल सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन बारामती ट्रेकर्स क्लबचे अध्यक्ष अँड  सचिन वाघ यांनी दिले , यावेळी अँड वाघ यांनी बारामती ट्रेकर्स क्लब च्या माध्यमातून अनेक युवक 

युवतींना किल्ले सफर ,ट्रेकिंग क्लायबिंग ची सफर घडवण्यासाठी व किल्ले संवर्धनासाठी इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी ट्रेकर्स क्लब सदैव  प्रयत्नशील असतो. परंतु क्लायबिंग या साहसी धाडसी प्रकार करणे कामी युवक-युवतींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो व अनेक युवक केवळ सुविधा नसल्या कारणामुळे या साहसी प्रकारापासून दूर राहत आहेत अशी खंत देखील अँड वाघ यांनी निवेदनपत्रा द्वारे व्यक्त केली आहे

बारामती सारख्या प्रगत भागामध्ये क्लायबिंग वॉल तयार केल्यास आपल्या भागातील अनेक मुले मुली ऑलम्पिंक सारखे स्पर्धेत क्लायबिंग या खेळामध्ये चमकू शकतात क्लायबिंग वॉल च्या माध्यमातून बारामतीच्या वैभवामध्ये भर पडेलच सोबतच मुला-मुलींमध्ये इतिहास गड किल्ले संवर्धन याची आवड निर्माण होईल त्याचबरोबर रॉक क्लायबिंग असा खेळ प्रकार आहे ज्यामुळे शारीरिक-मानसिक नियंत्रणास सह गिर्यारोहणाची शक्ती सहनशक्ती ,चपळता आणि संतुलन याचा समतोल साधून माणूस परिपक्व बनतो त्यामुळे क्लायबिंग वाल बनवल्यास एक आदर्शवत कार्य आपल्या हातून घडेल व बारामती सारख्या शहरांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून अनेक विद्यार्थी युवक-युवती ट्रेनिंग घेऊन ऑलम्पिक मध्ये सहभागी होऊ शकतात असे ही  ट्रेकर्स क्लबच्या अँड वाघ यांनी नमूद केले आहे,यावर अजित दादा पवार यांनी लवकरात लवकर प्रस्तावित उद्यानामध्ये क्लायबिंग वॉल तयार करू असे आश्वासित केले यामुळे भावी पिढीला ट्रेकिंग चे ट्रेंनिग मिळणं सोपं जाईल ही बाब गड-किल्ले प्रेमीं मध्ये उत्साह वाढवणारी आहे .

यावेळी बारामती नगरपालिकेचे माजी  उपनगराध्यक्ष जय पाटील , बारामती ट्रेकर्स क्लबचे प्रशांत राजपुरे, ऋतुराज काळकुटे , राहुल झाडे  उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.