राळेगणसिद्धी येथील शिबिरात इंदापूर तालुका मोठ्या संख्येत सहभागी होणार.

 राळेगणसिद्धी येथील शिबिरात इंदापूर तालुका मोठ्या संख्येत सहभागी होणार.



इंदापूर प्रतिनिधी:महेश गडदे.


 राळेगणसिद्धी येथे बुधवारी ( दि . २४ नोव्हेंबर ) रोजी होणाऱ्या शिबिरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत ,अनेक वर्षे भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यासाच्या कमिट्या जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बरखास्त केल्या होत्या .

परंतु पुन्हा एकदा  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कमिट्या सुरू करण्याचा निर्णय अण्णांनी घेतला आहे.

 बुधवार दिनांक २४ रोजी राळेगणसिद्धी येथे सकाळी १० ते ५ या वेळेत पुणे जिल्ह्यातील नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मार्गदर्शन करणार आहेत .

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील नवीन व जुने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, 

परंतु इंदापूर तालुक्यातुन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने राळेगणसिद्धी येथे  शिबिराला उपस्थित राहणार असल्याचे इंदापूर तालुक संघटक: जनार्दन पांढरमिसे, इंदापुर शहर संघटक: प्रशांत शिताप यांनी सांगितले.

 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास इंदापूर संघटनेचे  कार्यकर्ते शिबिरासाठी मोठ्या उत्साहीत असल्याचे दिसून येते आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा