इंदापूर कौठळी जि.प.प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा.
इंदापूर कौठळी जि.प.प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा.
प्रतिनिधि:महेश गडदे.
आज दिनांक 26 नोव्हेंबर जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.प्रथम उपशिक्षिका आरती गायकवाड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.वाचना नंतर 26/11 च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिक व शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
भारतीय संविधान दि. 26 नोव्हेंबर निमित्त संविधानाचा परिचय होऊन सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी जाणीव जागृती होणे तसेच संविधानातील मुलतत्त्वांचा प्रचार व प्रसार होणे या उद्देशाने माझे_संविधान_माझा_अभिमान या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले
.त्यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धा घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.प्रभातफेरी काढून संविधाना विषयी जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे नियोजन नंदकुमार सूर्यवंशी, भारत ननवरे व आरती गायकवाड यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा