हा विजय विरोधी पक्षाचा नसुन शेतकऱ्यांचा आहे: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.
हा विजय विरोधी पक्षाचा नसुन शेतकऱ्यांचा आहे: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.
प्रतिनिधी महेश गडदे,
राळेगण सिद्धी (अहमदनगर) :
केंद्र सरकारच्या नवीन कृषी विषयक कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी आंदोलनही उभे केले होते. अखेर केंद्रातील भाजप सरकारने नवीन तीन कृषी विषयक कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन तीन कृषी कायदांचे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विरोधकांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्य केले आहे. या परिस्थितीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाष्य केले आहे.
अण्णा हजारे म्हणाले, कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतल्याची बातमी ऐकली. याचा आनंद झाला असून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी हजारे पुढे म्हणाले की, हा विजय विरोधी पक्षाचा नसून शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आहे आणि देशाला आंदोलन करून यश मिळवण्याचा मोठा इतिहास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेबाबत नंतर राज्याच्या विविध घटकातून प्रतिक्रिया येत आहेत. कृषी प्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांना जे उत्पन्न मिळत त्यासाठी उत्पन्नावर आधारित भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी देखील हजारे यांनी यावेळी केली.
कृषिप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. कारण शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. तो जगाचा पोशिंदा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा