संविधान दिना निमित्त श्री बाबीर विद्यालाय रुई येथे संविधान वाचन केले.

संविधान दिना निमित्त श्री बाबीर विद्यालाय रुई येथे संविधान वाचन केले.


प्रतिनिधि:महेश गडदे.

  रुई ता.इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात आज भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान वाचन घेण्यात आले. 

    विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांचे हस्ते पूजन करून 'माझे संविधान माझा अभिमान' हा उपक्रम शासनाने राबवण्याचे ठरवले आहे त्यादृष्टिकोणातून त्याचे महत्व विद्यार्थाना कळावे यासाठी भारतीय संविधानातील तत्वे,मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत,शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूल्य रुजवणं, विद्यार्थांना शालेय जीवनापासून संविधानातील मुळंतत्वां विषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी,अशा उद्देशातून ' माझे संविधान माझा अभिमान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.


      यावेळी मा.मुख्याध्यापक यांनी संविधाना विषयी जनजागृती करून याचे महत्व विद्यार्थांना पटवून सांगितले,यावेळी संविधानाचे वाचन क्रीडा शिक्षक गौतम सोनवणे यांनी केले,यावेळी पर्यवेक्षक तानाजी मराडे,सर्व शिक्षक-शिक्षिका आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.