राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांना कडबनवाडी गावात प्रवेश बंदीचा निर्णय माघारी: माऊली चवरे.
राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे यांना कडबनवाडी गावात प्रवेश बंदीचा निर्णय माघारी: माऊली चवरे.
प्रतिनिधि महेश गडदे.
कडबनवाडी गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांनी शेळगांव कडबनवाडी रुई रस्ता अर्धवट काम झाले आहे. रस्त्याचे काम सुरू केले जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्याच्ये मा.श्री दत्तात्रय भरणे वनराज्यमंत्री यांना गावात येण्यास शेतकरी व ग्रामस्थ विरोध करणार होते.
परंतु शासकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी लेखी स्वरूपात काम दिवाळी झाल्या नंतर कामाला सुरुवात करणार आहोत असे लेखी पत्र दिले त्यामुळे काही दिवस आम्ही जो निर्णय घेतला होता तो परत घेत आहोत.
लेखी आश्वासन:मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये पॅकेज क्र . PUN ५४ अंतर्गत सदर काम सा.क्र . ०/०० ते ७/०० असे मंजूर असून सदर कामामध्ये काही लांबीत खडीकरण व MPM चे काम झालेले आहे . सा.क्र . ०/२५० ते ०/७५० या लांबीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या अडथळ्यामुळे व सा.क्र . ०/७५० ते ०/८१० मध्ये वनहद्द वाटप क्षेत्र ( गट क्र . ३० ९ , ३१० ) तसेच सा.क्र . १/३५० ते १/७७० ( गट क्र . २ ९९ ) वनहद्द वाटप क्षेत्र ( गट क्र . १८१ ) सा.क्र . ३ / ६२० ते ४/२५० वनहद्द वाटप क्षेत्र या वनहद्द वाटप क्षेत्र व खासगी मालकीच्या सर्व्हे क्रमांकावरून सदर रस्ता गेलेला असलेने वन खात्याने केलेल्या दिनांक ०२/०७/२०२१ च्या मा . उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या साईट व्हिझिटमध्ये नमूद केल्याने सदर ठिकाणी काम थांबविलेले आहे . इतर लांबीतील काम दिवाळी नंतर डांबरीकरणाचे प्लॉट सुरू झाल्यानंतर पुर्ण करण्यात येईल . तसेच सा.क्र . ४/६५० ते ६/२५० ( गट क्र . ३६ व १८४ शेळगाव ) ( गट क्र . ९ ३ रूई ) या हद्दीतील वनक्षेत्रातील कामाच्या परवानगी करीता प्रस्ताव दिनांक २७/०५/२०२१ रोजी वन कार्यालयास सादर केलेला आहे . वनविभागाकडून सदर प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सदर लांबीतील काम करण्यात येईल .
परंतु रस्ता नाही झाला तर पुढील निर्णय गावातील ग्रामस्थ व शेतकरी यांच्या वतीने मिटींग घेऊन घेतला जाईल असे श्री माऊली चवरे , किसान मोर्चा प्रमुख पच्क्षिम महाराष्ट्र , भारतीय जनता पार्टी यांनी सांगीतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा