महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच पुणे जिल्हा शाखेच्यावतीने नुतन शिक्षक पतसंस्था पदाधिकारी यांचा सत्कार...

महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच पुणे जिल्हा शाखेच्यावतीने नुतन शिक्षक पतसंस्था पदाधिकारी यांचा सत्कार...


प्रतिनिधि महेश गडदे

दि १० महाराष्ट्र राज्य एकल सेवा मंच पुणे जिल्हा शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आचार्य भवन शिरूर येथे कोरोना बाबतचे सर्व शासकीय नियम पाळून संपन्न झाला. 

या कार्यक्रमात जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव मांडवे , शिरूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संभाजी धुमाळ , खेड तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन हिरामण कुसाळकर , पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे संचालक आबासाहेब खवले यांचा एकल सेवा मंच राज्य अध्यक्ष एल पी नरसाळे , राज्य मार्गदर्शक श्री राजेंद्र गरूड श्री शरद मचाले यांच्या हस्ते करण्यात आला.


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दादाभाऊ खेसे यांनी केले. प्रसंगी बापू साहेब लांडगे , कल्याण कोकाटे , मारूती निकम , वैशाली काटे संदीप थोरात यांनी मनोगते व्यक्त केली.शिक्षक हिताचे निर्णय घेण्यासाठी सदैव तत्पर राहू. शिक्षक पतसंस्था अधिकाधिक बळकट करू असे सांगितले.                                         

                        सत्कार समारंभासाठी सुरेश देठे , प्रविण घोलप , सुनील ढमाले , संजय राळे पाटील , दत्तात्रय शिनगारे , विलास शिंदे , अशोक चव्हाण , गडदरे सर,अशोक कर्डिले , प्रदीप वाघोले , ललित गाढवे,बाळासाहेब डांगे,अनिल शेळके उपस्थित होते. सुत्रसंचालन विकास उचाळे सर यांनी केले.आभार शरद दौंडकर सर यांनी मानले.अशी माहिती इंदापूर तालुक्याचे प्रसिद्धीप्रमुख भारत ननवरे यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.