भष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन,

 भष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन,


प्रतिनिधी:महेश गडदे,

महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये लोकायुक्त कायदा मंजूर करावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचे ठरवले आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्रातून जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालय यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेला आहे, 

लोकपाल संदर्भामध्ये माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या चार ते पाच बैठका झालेले आहेत तरी देखील या विषयाकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून सदर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी करण्याचे ठरवले आहे, 

या संदर्भामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन तालुका संघटक आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून तहसीलदार इंदापूर यांना निवेदन देण्यात आलेले आहे,

 हे निवेदन तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले जावे यासाठी निवेदन देण्यात आलेला आहे तसेच त्याबरोबर लोकशाही दिन महीन्याच्या तिसर्या सोमवारी घेण्यातयावा व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी सोडले जावेत या उद्देशाने देखील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटना इंदापुर यांनी निवेदन दिले, 

त्याबाबत माननीय तहसीलदार श्रीकांत पाटिल यांनी याच महिन्यांमध्ये लोकशाही दिन घेण्यात येईल व आपल्याला ज्या पद्धतीने लोकशाही दिन घेता येईल त्या पद्धतीने आपण सोशल डिस्टिक चे नियम पाळून लोकशाही दिन घेऊ असे आश्‍वासन दिले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.