शिक्षक सेवेबरोबर स्वतःचे कलागुण जोपासणे काळाची गरज
शिक्षक सेवेबरोबर स्वतःचे कलागुण जोपासणे काळाची गरज - केंद्र प्रमुख संभाजी आजबे.
किरण म्हेञे व सतिश भोंग यांचा सत्कार संपन्न..प्रतिनिधि:महेश गडदे,
दि. ७ व्याहाळी केंद्रातील वडापुरेवस्ती शाळेचे उपशिक्षक , शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा संचालक श्री किरण म्हेञे यांनी मराठी साहित्य शिलेदार नागपूर यांचेकडून साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ,
शिंदेवस्ती शाळेचे शिक्षक श्री सतिश भोंग यांना आदर्श बहुजन टीचर्स यांचे तर्फे राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र प्रमुख संभाजी आजबे यांचे हस्ते फेटा , पुष्पहार , शाल , पेन , पुस्तक , नारळ देवून सन्मान करण्यात आला.
प्रसंगी संभाजी आजबे यांनी शिक्षकांनी शिक्षक सेवा करत असताना आपले कलागुण जोपासून त्याचा उपयोग अध्यापनात करावा असे सांगितले ,
त्याचबरोबर दत्ताञय लकडे , किरण म्हेञे , सतिश भोंग , यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी अतुल जौंजाळ , नंदकुमार सूर्यवंशी , गणेश लाळगे , बापूराव राऊत , चंद्रकांत रामाणे , सुनिल , पवार , संतोष चोरमले , नितिन राठोड , रत्नमाला भोंग , जयश्री मिसाळ , मोनाली जौंजाळ , अर्चना लाळगे , उपस्थित होते.
सुञसंचालन व नियोजन भारत ननवरे यांनी केले आभार संतोष हेगडे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा