श्री.सुनील धुरूपे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2021 प्राप्त
श्री.सुनील धुरूपे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2021 प्राप्त,
प्रतिनिधि:दि.१०. महेश गडदे,
रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मंगलदिनी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक सन्मान सोहळा थाटात संपन्न झाला. श्री.धुरूपे यांना उसतोड कामगार व मासेमारी मजुरांच्या मुलांच्या भरीव शैक्षणिक योगदानासाठी संस्थेने .
महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारासाठी निवडलेल्या १५१ मानकऱ्यांना ऑनलाईन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. श्री. विजयकुमार शहा या ऑनलाईन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना ऑनलाईन ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली.
श्री. धुरूपे हे इंदापूर तालुक्यातील ढूकेवस्ती केंद्र वरकुटे बु येथे प्राथमिक शिक्षक असून त्यांचे ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा