अतुल झगडे विकासाचे अष्टपैलू नेतृत्व
सरपंच कसा असावा? अतुल झगडे विकासाचे अष्टपैलू नेतृत्व .
प्रतिनिधि:महेश गडदे,
झगडे वाडी गावात शांत संयमी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे लहान पणीचे शिक्षण गावातील शाळेत झाले त्या नंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्याच काळात पितृ छत्र काळाने हिरावून नेले आणि घरातील सर्व जबाबदारी खाद्यावर आली अशातच मित्र मंडळी नातेवाईक सर्वांच्या मार्गर्शनाखाली व्यवसाय चालू केला तो नावारूपाला आणला हा अतुल यांच्या आयुष्यातील महत्वाचा दहा ते अकरा वर्षांचा टप्पा होता त्याच काळात जनते मधून गावचा सरपंच निवड सरकारने निर्णय केला व अतुल यांनी आपल्या सुविद्य पत्नी सौ रुपाली यांना जनतेतून बिन विरोध निवडून आणले आणि त्या नंतर गावात अनेक विकासाची कामे होण्यास सुरवात झाली आणि त्या मध्ये गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, पक्के रस्ते, मुरुमीकरण रस्ते, असे अनेक प्रकारचे रस्ते तयार करण्यात आले आणि आणखीन नवीन रस्ते तयार होत आहेत,
तसेच बंधिस्त गटारी, वेग वेगळ्या सरकारी योजना प्राधान्याने राबविण्यात येत आहेत, मा खासदार बारामती लोकसभा यांचा खासदार निधी विकासासाठी गावात आणला. तसेच गावात लाईट ची रात्री वेळी सोय व्हावी म्हणून वेग वेगळ्या ठिकाणी लाईट ची सोय करण्यात आली व गावात ठीक ठिकाणी मोठे हाय मास दिवे लावण्यात आले आणखीन नवीन दिवे काही ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
गावात पिण्याच्या पाण्यासाठी चांगली सोय होण्यासाठी सरकार विहीर वरती नेहमी जातीने लक्ष घालून पाणी पुरवठा करत आहेत. जनाई मळा येथील गावातील नागरिक यांना पिण्या च्या पाण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना राबून ते काम पूर्ण होत आहे. गावातील ग्राम विकास अधिकारी यांच्या सहकार्याने ग्राम विकासाच्या अनेक योजना आणून त्या पूर्णत्वास आहेत ग्राम विकास कर आकारणी पूर्ण होत आहे त्यामुळे गावातील अनेक कामे झाली आहेत व होत आहेत.
विकासाची दुर्दम्य इच्छा शक्ती असणारे असे अष्टपैलू नेतृत्व आहे. गावाच्या विकासात आणखीन एक मानाचा तुरा रोवला तो म्हणजे गावाचे भूषण असे ग्राम सचिवालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा, गावातील लहान मुलांना शिक्षण साठी चांगली सोय व्हावी म्हणून या कोरोना च्या काळात ही बांध काम पूर्ण केले गावातील नागरिक यांना सुसज्ज असे ग्राम सचिवा लय बांधण्यात आले. अतुल यांच्या विकासाच्या दूरदृष्टी मुळे महाराष्ट्र राज्य मंत्री मा श्री भरणे मामा यांनी सव्वा वर्षापूर्वी पक्ष संघटन मजबूत व्हावे म्हणून मानाचे तालुका कार्य अध्यक्ष पदी निवड केली अतुल यांनी ही निवड सार्थ ठरवत जोमाने समाजाची सेवा व काम करत आहेत.
गावातील लाईट शेती साठी महत्वाची आहे हे अतुल यांच्या दूरदृष्टी ने ओळखले व गावात ३३.११ के व्ही चे विद्युत बोर्ड मंजूर करून घेतले. त्याचे ही काम काही दिवसात चालू होणार आहे. तसेच गावातील लोकांना विशेष तरुण यांना व्यायमशाळां केलेली आहे. अशी विकासाची अनेक कामे गावात झाली आहेत व नवीन विकासाची कामे होणार आहेत. अतुल यांच्या कामातून गावात विकासाची गंगा येत आहे.
विकास करत असताना त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. गावात अशी अनेक कामे झाली आहेत पण सर्व कामांचा आढावा आज अतुल यांच्या वाढदीवसानिमित्त घेता येत नाही तरीही काही कामांचा आढावा आहे त्यांच्या कडून अशी अनेक कामे व्हावीत आणि गाव सुजलाम सुफलाम व्हावे हीच त्यांच्या वाढ दिवसाची गावातील नागरिक यांना भेट असेल या निमित्त मा श्री अतुल यांना उपसरपंच सौ राजगुरू, तंटा मुक्ती अध्यक्ष श्री लक्ष्मण झगडे, ॲड नितीन राजगुरू, बाळासाहेब झगडे, डॉ दादा राम झगडे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, व नागरिक यांचा कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा