किशोरवयीन मुलीसाठी आॕनलाईन समुपदेशन शिबीर संपन्न.



किशोरवयीन मुलीसाठी आॕनलाईन समुपदेशन शिबीर संपन्न.

 रोहित पवार यांचे वाढदिवसाच्यानिमित्ताने पुणे जिल्हा एकल प्राथमिक महिला आघाडी यांचे वतीने किशोरवयीन मुलीसाठी आॕनलाईन समुपदेशन शिबीर संपन्न


      प्रतिनिधि:महेश गडदे,

 दि २६ पुणे जिल्हा एकल प्राथमिक महिला शिक्षक आघाडी यांचे वतीने आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा अंतर्गत किशोरवयीन मुलींच्या समस्या , मासिक पाळी व्यस्थापन , स्त्रीयांचे विविध आजार व समस्या याबाबत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांचे हस्ते एक्सेलेन्स ॲवार्ड व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत , बारामती शासकीय मेडिकल काॕलेज सदस्य , सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डाॕ राजेश कोकरे यांचे आॕनलाईन मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.


आॕनलाईन शिबीरासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे २०० किशोरवयीन मुली , महिला शिक्षिका , महिला पालक सहभागी झाल्या.डाॕ राजेश कोकरे यांनी मासिक पाळी व्यवस्थापन , किशोरवयीन मुली व महिलांमधील विविध आजार व घ्यायची काळजी याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

सदर मार्गदर्शन शिबीराचे प्रास्तविक वनिता जगदाळे यांनी केले. स्वागत महिला अध्यक्षा पल्लवी गायकवाड यांनी केले.प्रसंगी डाॕ उषा भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले.सुञसंचालन सुप्रिया आगवणे यांनी केले व आभार मनिषा माने यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.