श्रीमती सुप्रिया गेनबा आगवाने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

 श्रीमती सुप्रिया गेनबा आगवाने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.


प्रतिनिधि :महेश गडदे,

शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना

राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडनी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या शाळेतील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुप्रिया गेनबा आगवाने यांना SUPER 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार 2021या पुरस्काराने गौरवण्यात आले.


 सदर पुरस्कार वितरण सोहळा बारामती तांबे नगर याठिकाणी मेडिकोज गिल्ड, भिकोबा तांबे सभागृह.एम. आय. डी.सी.,बारामती रविवार दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता

मेडीकोज गिल्ड, भिकोबा तांबे सभागृह, एम.आय.डी. सी.,बारामती येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.

प्राध्यापक प्रज्ञा हरिश्‍चंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

Super 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार 2021 यामध्ये राज्यातून केवळ पाच प्राथमिक शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली होती. इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका सुप्रिया आगवणे यांची निवड ही इंदापूर तालुक्यासाठी आभिमानाची गोष्ट आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.