तहसीलदार श्रीकांत पाटिल यांच्या उपस्थितीत एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा,

 तहसीलदार श्रीकांत पाटिल यांच्या उपस्थितीत एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा,



प्रतिनिधि: महेश गडदे,

इंदापूर दि.२८,आज पळसदेव या ठिकाणी राष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्री श्रीकांत पाटील साहेब तसेच एल.जी बनसुडे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) बनसुडे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे व पळसदेवचे सरपंच इंद्रायणी सुजित मोरे, उपसरपंच पुष्पलता राजेंद्र काळे ,सदस्यां जयश्री शेलार, सदस्य कैलास भोसले , सचिव नितिन बनसुडे, प्राचार्य सुरज बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे , तात्यासाहेब बंडगर, दादासाहेब खारतोडे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते .


या कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या माहितीचा अधिकार व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे अनुभवाचे बोल या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांचा करण्यात आले, तसेच इंदापुरचे  तहसीलदार श्रीकांत पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकारी कायद्याविषयी मार्गदर्शन केले, हा कायदा माहिती स्वातंत्र्याचा कायदा आहे.या कायद्याने शासकीय कामकाजाची सर्व माहिती घेता येते आपण शासनाला टॅक्स रूपाने जो कर भरतो त्याची देखील माहिती आपणास या कायद्याच्या माध्यमातून घेता येते, हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असून 65 वर्षानंतर भारतीय नागरिकांना मिळालेले खरे स्वातंत्र्य आहे.कायद्याचे महत्त्व व त्याबाबत असणारे फायदे व जागृकता याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले .


तहसीलदार श्रीकांत पाटिल साहेबांच्या हस्ते सन २०२० - २१ मध्ये इयत्ता १० वी व इ १२ वी च्या प्रथम तीन क्रमांकाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (नाना) बनसुडे यांनी कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्वच्छता पाळली पाहिजे व त्यासाठी योगा व्यायाम या बाबत मार्गदर्शन केले यांनी व जनार्दन पांढरमिसे भ्ररष्टाचा विरोधी जन आंदोलन न्यास तालुका संघटक यांनी   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले


  सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन प्रवीण मदने व आभार प्रदर्शन दीपक वडापूरे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.