सौ.सिंधू बनसोडे यांना साहित्य सेवा सन्मान पुरस्कार
सौ.सिंधू बनसोडे यांना साहित्य सेवा सन्मान पुरस्कार,
प्रतिनिधी दि.१०.महेश गडदे.
इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका नवोदित कवी, चारोळीकार व हायकूकार सौ.सिंधू रावसाहेब बनसोडे यांना मराठीचे शिलेदार समूह नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय 'मराठी साहित्य सेवासन्मान पुरस्कार' नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रदान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य लेखक दादाकांत धनविजय, उद्योजक सचिन गावखडकर, बेंजहबचे संचालक मयुर निमजे, डॉ. अनिल पावशेकर, साहित्यिक प्रा. आनंद मांजरखेडे, मीडिया पत्रकार रेणुका किन्हेकर, मराठीचे शिलेदार समूहाचे अध्यक्ष राहुल पाटील, अभिनेत्री प्राजक्ता खांडेकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ.बनसोडे ह्या भोडणी येथे प्राथमिक शिक्षिका असून त्यांनी एम ए (मराठी), डी. एड. डी. एस. एम. जी. डी. सी. ए. आदी पदव्या व आदी पदविका मिळवल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा