ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे करणार मजबूत संघटन .

ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे करणार मजबूत संघटन .



इंदापूर प्रतिनिधी महेश गडदे,

जेष्ठ समाजसेवक मा.आण्णासाहेब हजारे यांनी पुन्हा एकदा राज्य स्तरावर मजबूत संघटन बांधणी करण्याचा विचार केला आहे ,विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नावरती लोकशिक्षण लोकजागृती तसेच आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी दिनांक 18 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथे माजी जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती,

 या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 262 तालुक्यात संघटन मजबूत करण्याचे काम केला आहे,सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून शिवाजी खेडकर यांची नियुक्ती केली असून शिवाजी खेडकर यांनी दिनांक 9स्पटेंबर 2021 रोजी पुणे येथे बैठक घेतली त्या जिल्हा बैठकीमध्ये तेरा तालुक्यांपैकी दहा तालुक्यांची तालुका संघटक म्हणून निवडी करण्यात आल्या,


 त्यामध्ये इंदापूर तालुक्यात:जनार्धन पांढरमिसे यांची तालुका प्रमुख संघटक पदी निवड करण्यात आली आहे, आंदोलनाच्या माध्यमातून विविध समित्यांची नियुक्ती तालुका पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत केली जाणार आहे.

 त्यामध्ये कामगार समिती, वीजग्राहक, शेतकरी ,मानवाधिकार ,भ्रष्टाचार निर्मूलन, दक्षता समिती, अशा अन्य समिती या शासनाच्या जवळपास 28 ते 29 समिती वरती समित्या स्थापना करण्याचे काम राज्यभर केले जाणार आहे.या संदर्भातली माहिती पुणे जिल्हाप्रमुख शिवाजी खेडकर यांनी काल बैठकीच्या दरम्यान दिली.तसेचं ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांचे विचार पुस्तकांच्या माध्यामातून सर्वांन पर्यंत पोचवण्याचे ध्येय ठेवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.