राष्ट्रीय समाज पक्षाचा बावडा जिल्हा परिषद गटात महामेळावा
राष्ट्रीय समाज पक्षाचा बावडा जिल्हा परिषद गटात महामेळावा
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील 1000 शाखा ओपनिंग अभियानास पुणे जिल्हा इंदापुरातुन सुरुवात
इंदापूर; प्रतिनिधी: महेश गडदे,
काल दिनांक . 10 सप्टेंबर 2021 रोजी श्री. माऊली सलगर पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, श्री. अजित दादा पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी, श्री. शाहिद भाई मुलाणी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडी प्रभारी व पुणे जिल्हा प्रभारी श्री. किरण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. सतीश नाना तरंगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्यातील शाखा ओपनिंग करण्यात आलेल्या नवनिर्वाचित खोरोची शाखा, खरात वस्ती शाखा, निरवांगी शाखा, रेडणी शाखा, बावडा शाखा आणि चाकाटी शाखा.
याबरोबरच भव्य रॅली काढण्यात आली आणि इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटामध्ये मेळावा यशस्वी पार पडला. या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इंदापूर तालुक्यातील सर्वच झेडपी पंचायत समितीच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार असून
कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र प्रभारी श्री माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित दादा पाटील, श्री किरण गोफणे व इंदापूर तालुका प्रभारी सतीश नाना तरंगे यांनी आवाहन केले
यावेळी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते तानाजी शिंगाडे रासपचे नेते शहाजी भाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे युवानेते गणेश हेगडकर, इंदापूर तालुका प्रभारी निर्मला ताई शिंदे, युवक प्रभारी अभिजीत भाळे, इंदापूर शहराध्यक्ष उमाताई मखरे, आप्पा माने, श्रीनिवास सातपुते, नवनाथ कोळेकर, बजरंग वाघमोडे,मनेश जाधव, सचिन पलंगे, तानाजी मारकड, अविनाश मोहिते, समाधान काशीद, तात्याराम मारकड, ज्योतीराम गावडे, रणजीत तरंगे, संदीप भिंगारदिवे, विठ्ठल काळे, दयानंद हेगडकर, मंगेश तरंगे गणेश काशीद, असे अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे गणेश हेगडकर यांनी आभार मानले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा