इंदापूर: सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले,

 

इंदापूर: सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण.


प्रतिनिधि: महेश गडदे,

श्री नरसिंह प्रासादिक गणेशोत्सव मित्र मंडळ, श्री संत नामदेव मंदिर कासार पट्टा यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत,

 तसेच गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या 101 व्या स्थापना वर्षा च्या अनुषंगाने ,दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी,


 इंदापूरच्या नगराध्यक्षा माननीय सौ अंकिता मुकुंद शहा, व श्री मुकुंद शेठजी शहा, सचिव इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या हस्ते सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय येथे 101 झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले, 

जागतिक बांबू दिनानिमित्त माननिय नगराध्यक्षा सौ अंकिता ताई शहा यांच्या हस्ते बांबूचे रोपटे लावून वृक्षारोपनास सुरुवात केली,


 मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षमित्र श्री चंद्रकांत देवकर, श्री सुनील शिरसठ ,विद्यालयाचे शिक्षक श्री सुनील मोहिते सर ,नगरपरिषदेचे श्री अल्ताफ पठाण, यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष श्री भरत देशमाने, तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अशोक चिंचकर, श्री अमर लेंडवे, गौरवगा नबोटे,अनिकेत गानबोटे,योगेश देशमाने,राहुल गानबोटे,गणेश भोज, उपस्थित होते.

इतर कार्यकर्ते तसेच लहान कार्यकर्ते यांनी वृक्षारोपण केले आणि वसुंधरेची शपथ घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.