इंदापुरच्या मनिषा बंड यांना Edu लिडर पुरस्कार 2021 ने सन्मानीत..!

 राज्यस्तरीय डिजिटल शैक्षणिक मासिक यांचे वतीने मनिषा बंड Edu लिडर पुरस्कार 2021 ने सन्मानीत..!


प्रतिनिधि: महेश गडदे.

दि ८ बदलत्या शैक्षणिक प्रवाहाचा वाटाड्या हे ब्रीद ध्येय संपूर्ण राज्यभर राज्यस्तरीय डिजिटल शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांना edu लिडर २०२१ पुरस्कार वितरण शिक्षक भवन तळेगाव ढमढेरे येथे मासिकाचे मुख्य संपादक उमेध धावरे , संपादक पृथ्वीराज काळे , नामदेव पांचाळ , उपसंपादक सागर शिंदे , गणेश शिंदे यांचे हस्ते वितरण झाले. इंदापूर तालुक्यातून मनिषा बंड यांची निवड झाली. त्यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत पूरस्कार स्विकारला .


इंदापूर तालुक्यातून कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देता.आॕनलाईन , आॕनलाईन गृहभेटी , ओसरी शाळा , शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यात यशस्वी झालेल्या भिगवण शाळेच्या तंत्रस्नेही , गुणवंत शिक्षिका मनिषा बंड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक , सहकारी शिक्षक , विद्यार्थी , पालक , शिक्षक यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.