हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी नागरिकांची अलोट गर्दी !

दिपावली निमित्त इंदापूरात मान्यवरांची मंदियाळी! 
भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देताना झालेली गर्दी.

Zee महाराष्ट्र न्यूज. इंदापूर - महेश गडदे.

इंदापूर. दि.०१: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाग्यश्री निवासस्थानी परंपरेनुसार दिपावली फराळ स्नेह कार्यक्रम हजारो नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये व उत्साही वातावरणात गुरुवारी (दि.31) संपन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देणेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी मंदियाळी पहावयास मिळाली. 
        
हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व कुटुंबीयांकडून प्रत्येक वर्षी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील जनतेशी कौटुंबिक नाते जपले आहे, याचा प्रत्यय भागश्री बंगल्यावर झालेल्या प्रचंड जनसागराच्या रूपाने दिसून आला. याप्रसंगी तुतारीच्या मंगलमय आवाजाने वातावरण प्रफुल्लित झाले होते. 


यानिमित्ताने भाग्यश्री बंगलो परिसर हा राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर, सर्वधर्मीय नागरिक, हितचिंतक व महिला भगिनींच्या गर्दीने फुलून गेला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व आपले प्रेम, आशीर्वाद पाठीशी राहू द्या, अशी मनःपूर्वक विनंती केली. यावेळी हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांनी जनतेच्या शुभेच्छांचा स्विकार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.