जय हनुमान बहुउद्देशीय संस्था (भारत सरकार चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त) वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २० सप्टेंबर २०१३ रोजी 'स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजाराम मोहन रॉय, आत्माराम पाटील, यांच्या विचाराने व महादेव जानकर साहेब यांच्या प्रेरणेतून व स्व.तात्याबा रामा मारकड यांच्या आशीर्वादाने तानाजी मारकड यांनी वयाच्या २१ व्या वर्षी सामाजिक कार्याचा उदात्त हेतू ठेवून या संस्थेची स्थापना केली.
महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व लहान वयातच आजोबा तात्याबा रामा मारकड यांच्या बरोबर आठ-नऊ वर्षाचा असताना त्यांनी आपल्या नातूवर लहान वयातच समाजसेवेचे लोककल्याणाचे धडे दिले, तात्याबा मारकड हे हनुमान भक्त होते ते जनावरांचा तकला,भिरुड काढायचे ते विनामूल्य प्राणीमात्रांची सेवा करायचे ते हनुमानाची पूजा दर्शन घेण्यासाठी रुई गावामध्ये चालत जायचे, जाण्यासाठी लांब असण्यामुळे त्यांनी १९९९ ला तळेवस्ती येथे हनुमानाची मूर्ती मांडून पूजा सुरू केली, व १९९९ पासून हनुमान जयंती सुरु केली.
२००१ ला लोकसहभागातून पुढाकार घेऊन स्वतःच अमूल्य योगदान देऊन तात्याबा मारकड यांनी हनुमान मंदिर बांधून हनुमान जयंती दिनी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, व हनुमान मंदिराचे लोकार्पण झाले, हा सर्व घटनाक्रम घडत असताना नातू तानाजी त्यांच्याबरोबर होता, त्यामुळे त्याच्या बालमनावर हनुमान भक्तीची ओढ निर्माण झाली, तो आजोबांबरोबर शनिवार उपास करू लागला, आजोबांबरोबर भिरूड-तकला काढण्यासाठी जात लोकांनी नारळ खडीसाखर कापूर दिलेला पूजा विधी करण्याची जबाबदारी छोट्या तानाजी वर येई, तानाजी मारुतीला, येताळाला जायचा नारळ फोडायचा पूजाविधी करायचा असा दर शनिवारी दिनक्रम चालायचा,
दरवर्षी जयंती उत्सव व्हायचा तळेवस्तीकरांना भक्ती रसाची गोडी लागली, गावातील आसपासचे भाविक येऊ लागले, अशा पद्धतीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
जयंती उत्सव दोन-तीन वर्ष चांगल्या पद्धतीने चालला अचानक २००४ ला तात्याबा मारकड यांचे निधन झाले त्यानंतर शनिवार उपास करणं भिरूड टकला काढणं आजोबांनी दिलेला जनावरांच्या सेवेचा गुरुमंत्र पुढे चालवण्याची जबाबदारी तानाजी वर पडली,लोकांच्या आग्रहास्तव लहान वयात हनुमान जयंती उत्सव समितीची जबाबदारी तानाजी वर आली, त्यामुळे लहान तोंडी मोठा घास या म्हणीचा या ठिकाणी प्रत्यय आला.
गहू गोळा करणे, लापशी करणे, पूजा-विधि ब्राह्मणांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा हनुमान जयंतीदिनी करणे, अशा प्रकारे जयंती सोहळा व्हायचा, २००७ ला जय हनुमान मित्र मंडळ नावाने मित्र मंडळ तानाजीने स्थापन करून लोकांकडून वर्गणी घेऊन हिशोबाच्या दृष्टीने पावती पुस्तक छापले, आजोबांनी दिलेला भिरूड- टकला, काढणं जनावरांच्या सेवेचा वसा आणि वारसा सक्षमपणे तानाजी व त्यांचे पिताश्री दादा पुढे नेत आहेत.
कधीकधी लोक तानाजी शाळेत असताना चालू वर्गातून बिरुड-तकला काढण्यासाठी न्यायचे असे प्रसंग, अनेक वेळा घडायचे त्यावेळी श्री बाबीर विद्यालयातील गुरुवर्य शिक्षक तानाजीला डॉक्टर तानाजी म्हणायचे अशा प्रकारे पशुसेवेचा निस्वार्थी वारसा पुढे चालवत असताना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तानाजीने २० सप्टेंबर २०१३ रोजी जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली.
२०१३ संस्थेच्या स्थापनेनंतर पशुसेवा तसेच व्यापक स्वरूपात लोककल्याणकारी कार्याला सुरुवात झाली, नंतरच्या काळात अनेक जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी निस्वार्थीपणे या लोकसेवेत तानाजीला साथ दिली, वृक्षारोपण,स्वच्छता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप, महापुरुषांच्या जयंत्या, व्यावसायिक प्रशिक्षण, महिला पुरुषांच्यासाठी शेळी-मेंढी प्रशिक्षण असे लोकोपयोगी अनेक उपक्रम सहकाऱ्यांच्या मदतीने संस्थेच्या वतीने तानाजीने राबवले.
२०१८ ला हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी तानाजीने स्व.तात्याबा रामा मारकड यांच्या स्मरणार्थ १ गुंठा जमीन बक्षीस पत्र देऊन, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य खात्याचे सभापती प्रवीण (भैया) माने यांच्या जि.प फंडातून ५ लाखाचा सभामंडप हनुमान मंदिरासाठी मंजूर करून, पाठपुरावा करून बांधून घेतला,
अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरू असताना इंदापूरचे पत्रकार डॉ.संदेश शहा यांच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्र पुणे चे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर सर यांची ओळख होऊन नेहरू युवा केंद्र पुणे, युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकारशी संस्था जोडली गेली,
त्यामुळे संस्थेला सरकारच्या संलग्न होऊन अनेक कार्यक्रम राबवण्याची संधी मिळाली, त्यामध्ये युवा संसद, राष्ट्रीय योग दिन, राष्ट्रीय युवा महोत्सव, संविधान दिन महापुरुषांच्या जयंत्यानिमित्त उपक्रम, इत्यादी असे अनेक उपक्रम,
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२२ कर्नाटक राज्यात हुबळी या ठिकाणी झाला तेथे संस्थेचे प्रतिनिधी म्हणून अजय खांडेकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी मिळाली, श्री बाबीरनगरी ऑक्सिजन पार्क लोकसभागातून महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्री बाबीर देवस्थान येथे वनजमिनीवर साकारण्याची संधी संस्थेला मिळाली.
त्या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री ना.दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते व प्रशासनातील प्रमुख अधिकारी वर्ग यांच्या उपस्थित तो देदीप्यमान कार्यक्रम झाला होता, तेथे लावलेली झाडे आपणाला आजही साक्ष देत आहेत, 'जिद्द ,चिकाटी, सातत्याच्या जोरावर शंकर मारकड, अविनाश मोहिते, आबासाहेब थोरात, वैभव पाटील,भागवत पाटील,विकास कणसे, अंकुश पाटील, संदिप बारवकर, अजय खांडेकर, भिवा मारकड,गणपत मारकड,अशा अनेक चीत-परिचित पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे आर्थिक क्षमतेची वानवा असताना सुद्धा संस्था कार्यरत राहिली,
श्री बाबीर देवाच्या, हनुमानरायाच्या कृपेने व सर्व सहकारी,आर्थिक मदत करणारे वेळ देणारे, या सर्वांच्या सहकार्यामुळे संस्थेला 'नेहरू युवा केंद्र पुणे, युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकारचा २००१-२०२२ चा जिल्हास्तर उत्कृष्ट संस्था पुरस्कार २६ जानेवारी २०२२ रोजी 'महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते २५ हजाराचा धनादेश, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन संस्थेचे अध्यक्ष व प्रतिनिधी यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी 'विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त, एन. वाय.के उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे पुरस्कार मिळाला.
'त्यानंतर संस्थेचा कार्य-अहवाल राज्यस्तरावर गेला व त्याही ठिकाणी संस्थेला राज्यस्तरीय उत्कृष्ट संस्था हा पुरस्कार 'नेहरू युवा केंद्र मुंबई, युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने मा.कृपाशंकर सिंह मा. गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ५०००० हजार रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह,देऊन संस्थेला गौरविण्यात आले, यावेळी राज्य संचालक प्रकाश कुमार मनोरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आज पर्यंतच्या कार्यकाळात इंदापूर भूषण, युवा-आयकॉन, अशा प्रकारचे अनेक सन्मान संस्थेला प्राप्त झाले, आहेत, संस्थेचं काम त्याग, सेवा, मदत व राष्ट्रहित हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे,
"परमेश्वर हा सत्य संकल्पनांचा पाठीराखा आहे,,
अशाप्रकारे सामाजिक कार्य सुरू असताना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश कुमार देशमुख यांनी पुणे जिल्हा सल्लागार समिती NYK, भारत सरकारच्या सदस्य पदी संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांची निवड केली, ही संस्थेसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट होती.
''पेरले तेच उगवल,
जे काम निस्वार्थीपणे केलं,
तेच परमेश्वराने सन्मानरूपाने दिल,
कधीही स्वप्नात देखील पाहीलं नव्हतं कि.हे काम करत असताना आपल्याला देशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला सरकारी खर्चाने उपस्थित राहून प्रतिनिधित्व करण्याची व दिल्लीतून सह्याद्री दुरर्दशन वाहीनीवर बोलण्याची संधी मिळेल,
'मेरी माती मेरा देश हा भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे होणार होता, या ,१० दिवशीय शासकीय कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तालुक्यातील मातीचा अमृत कलश घेऊन दिल्ली येथे जाण्याची व तेथे इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांना मिळाली,
या ठिकाणी ८५० स्वयंसेवकांचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीतून। सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर बोलण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांना मिळाली. भारत सरकार चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्था
कार्यालयीन माहिती
रजि.महाराष्ट्र १४८५दि.२०/९/२०१३ पुणे.
F - 44119 पुणे.
12 A -AAEAJ9430EE2023l
80-G -AAEAJ9430EF2023l
CSR00072968
NGO - DARPAN 623911
Account no - 059210400001506.
अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेक गोष्टींचा सामना करत अनेक संकटांना सामोरे जात, परिस्थितीवर मात करत, संस्थेचे सामाजिक कार्य सुरू आहे,आज संस्थेचा ११ वा वर्धापनदिन त्यानिमित्ताने संस्थेला मदत करणाऱ्या, सहकार्य करणारे, अमूल्य वेळ देणाऱ्या, आणि संस्थेच्या बद्दल हितचिंतनार्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवकाना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
लेखक :- श्री महेश भारत गडदे.
पत्रकार - समर्थ भारत वृत्तसेवा. Aaj 24 Tass.
अध्यक्ष इंदापूर तालुका ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा.
मो -७७६७९५८२००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा