कै.पै.आत्माराम बाबुराव पाटील ऊर्फ प्रतिशाहु महाराज, एक पँथर,
भाऊंच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
प्रतिनिधी: महेश गडदे.
बाबीर रुई चे वंशपरंपरागत पाटील, एक पहाडी व्यक्तिमत्त्व, भारदस्त रुबाबदार मिश्या, बोलताना हसत मिश्यावर हात फिरवत हसणार , गोरेपान, अंगात कडक नेहरू ,पायजमा, तुळतुळीत डोक्यावर गांधीटोपी,पायात कोल्हापुरी सहा फुटाच्या आसपास उंची आणि वजन शंभरी किलोच्या आसपास , करारी भेदक नजर,त्यामुळे
त्यांच्याकडे पाहिलं कि त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त दबदबा निर्माण व्हायचा, ज्यांचा आधार गोरगरिबांना, वंचितांना ,दीनदलितांना नेहमी वाटायचा, सदैव समाजसेवेसाठी सज्ज अस एक वादळी व्यक्तिमत्व.
अतिशय संघर्ष करून उभा राहिलेले व्यक्तिमत्व आत्माराम बाबुराव पाटील असंख्य अडचणींना तोंड देत अहानाच्या छाताडावर स्वार होत, शून्यातून विश्व निर्माण करणारे असे व्यक्तिमत्व कोर्टकचेऱ्या तर नेहमी पाचवीला पुजलेल्या परंतु या माणसाने कधीच कशाचं टेन्शन घेतलं नाही जे समोर येईल त्याला पायदळी तुडवत राखेतून उभारण्याचे फिनिक्स पक्षाप्रमाणे काम केलं,
स्वर्गीय आत्माराम बाबुराव पाटील यांच्या काळात रुई एक दुर्लक्षित गाव होतं त्या गावाला जायला एसटी सुद्धा नीट नव्हती , विद्यार्थ्यांना पाचवीनंतर शिकायला शाळा नव्हती त्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मुलींचं शिक्षण अर्ध्यावर सुटायचं त्या गावच्या विकासाचा वासाने वारसा पाटलांनी घेतला
गावातील मुलांना पाचवीनंतर शिक्षणासाठी 13 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं त्या गावात त्या गावाच्या विकासासाठी त्या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी या व्यक्तींन अहोरात्र मेहनत केली आणि श्री बाबीर विद्यालयाची स्थापना केली , स्थापना करताना अनंत अडचणी उभ्या राहिल्या पण त्यातून ही अतिशय खंबीरपणे उभे राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आत्माराम पाटील,
शाळेसाठी मुलांना इमारत नव्हती त्यामुळे स्वताच्या राहत्या घरातील कवाडे मुलांसाठी खुली केली, यासाठी फार मोठा मन आणि निस्वार्थी भावना लागते,साऱ्या गावाती
लेकरं आपलीच आहेत ती शिकली पाहिजेत ती घडली पाहिजेत, त्यातून अनेक शिक्षक डॉक्टर इंजिनीअर वकील सुशिक्षित पिढी गावासाठी घडवली पाहिजे अस मोठं करुणेने भरलेले हृदय लागत ते स्वर्गीय बाबुराव पाटील यांच्याकडे होते, वाडयात शाळा भरवली.
गावाच्या विकासासाठी त्या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी या व्यक्तींना अहोरात्र मेहनत केली आणि श्री बाबीर विद्यालयाची स्थापना केली, स्थापना करताना अनंत अडचणी उभ्या राहिल्या पण त्यातून ही अतिशय खंबीरपणे श्री बाबिर विद्यालया ची उभारणी केली व आज या विद्यालयाचा शिक्षण क्षेत्रात एक वेगळा नावलौकिक पाहायला मिळतो तो स्वर्गीय आत्माराम बाबुराव पाटील यांच्यामुळे,
ज्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांना आरक्षण नव्हतं त्यावेळेस स्वर्गीय आत्माराम बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील पहिली महिलांची बिनविरोध ग्रामपंचायतीची बॉडी निवडून आणण्याचे काम केलं याची दखल देशभरातील अनेक वृत्तपत्रांनी व मान्यवर नेत्यांनी घेतली होती त्यांच्या मुलाखती साठी अनेक नामवंत पत्रकार देखील आले होते की महाराष्ट्रातील ही एक वेगळी क्रांती त्यांच्या विचारांनी झाली होती असे काळाच्या पुढे विचार करणारे आत्माराम बाबुराव पाटील होते, गावचा इतिहास अगदी तोंडपाठ होता गावची मर्मस्थान, वर्मस्थान, तालुक्यातील व राज्यतील गाढा अभ्यास अनेक नामवंत राजकीय व्यक्ती यांच्याशी त्यांचे आपुलकी चे संबंध होते, सखोल ज्ञान गंगा त्यांच्याकडे होती.
रुई गावामध्ये राज्यातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या व्हाव्यात यासाठी सतत प्रयत्न केले ,त्यांना कुस्तीचा मर्दानी शौक होता ,यामुळे राज्यातील वेगवेगळ्या आखाड्यात जायचे आणि तेथील होतकरू गरीब पैलवानांना ते सढळ हाताने मदत करत, याचबरोबर रुई या गावी प्रथमच त्यांनी राज्यभरातील अतिशय नामवंत मल्लांच्या कुस्त्या पदरमोड करून घ्यायला सुरुवात केली , दर वर्षी ते मोठ्या हिमतीने त्या गावात माही पोर्णिमेला बाबिर देवस्थान ची फेब्रुवारी महिन्यात भरणार्या यात्रेत जंगी कुस्त्या चा आखाडा भरूवुन एक प्रकारची कुस्ती शौकिनांना एक वेगळी मेजवानी देत, याचबरोबर कुस्ती टिकावी कुस्ती वाढावी यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले अगदी शेवटपर्यंत कुस्तीवरील प्रेम आणि निष्ठा कधीही कमी झाली नाही, म्हणूनच पाटील कुस्ती पहायला गेल्यावर तेथील गावकरी त्याना सन्मानाने आखाड्यातून फिरायचे, तेव्हा कुस्ती निवेदक मधील एक नावाजलेलं नाव शंकर अण्णा पुजारी हे जेव्हा पाटील मैदानात येत तेव्हा लगेच म्हणायचे,
!! आले आले आले आता मैदानात प्रति शाहू महाराज आले, काय तब्येत ,कशी तब्येत ,आता या वयात आहे तर जवाणीत कशी असेल !! अस निवेदन अण्णा करायचे असं व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय बाबुराव पाटील त्यांची कुस्तीची परंपरा आजही चालू आहे.
श्री बाबिर देवस्थान ट्रस्टची स्थापना देखील त्यांनी केली, बाबीर देवाची अतिशय निस्सीम भक्त म्हणून पंचक्रोशीत श्री आत्माराम बाबुराव पाटील यांचा पंचक्रोशीतील अनेकांसाठी आदर्श ती कोणालाही कसलीही मदत लागली कुठलीही अडचण आली तर पाटलांचा आधार होता , त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत तारखा खेळल्या होत्या त्यामुळे कायद्यातील अधिक गावठी डाव त्यांमुळे एक नॉलेज अस वेगळं होतं , त्यांनी डव टाकला कि समोरचा पैलवान चितपट झाला म्हणून समजायचं, असा लौकिक त्यांचा होता, त्यामुळे असंख्य गोरगरिबांना त्यांचा आधार होता, अनेक युवकांचा नेहमी गराडा त्यांच्या भोवती असायचा, नेहमी त्यांच्या बरोबर सतत शे दोनशे मुलं वावरायची ,बसायला उठायला, असायची, इतका दबदबा होता.
कधीच त्यांनी पैश्यावर व दारूवर लोक गोळा केली नाहीत, पण त्यांच्या वरील लोकांच प्रेम मात्र एक वेगळंचं होतं ,त्यांच्यासाठी काहीपण करायला हे युवक तयार असत,जे त्यांनी फक्त आपुलकीने आणि एका वेगळ्या विचारधारेने मिळवलं होत,
त्यामुळे आजही या परिसरात त्यांची फार मोठी उणीव जाणवते, त्यांचे कार्य आणि प्रेरणा अनेक युवकांना प्रेरणादायी नक्कीच आहे, अशी आदर्शवत माणसं नेहमी स्मरणात राहतात आणि अनेकांचे आदर्श बनतात, आजही अनेकांच्या देव्हाऱ्यात यांचा फोटो अभिमानाने श्री बाबीर देवा शेजारी लावलेला पाहायला मिळतो, भाऊंच्या १९ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
लेखक:- अँड श्रीकांत रामचंद्र करे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा