बाबीर विद्यालयात रुई येथे इ.बी.सी शिबिर संपन्न
बाबीर विद्यालयात रुई येथे इ.बी.सी शिबिर संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: महेश गडदे.
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23साठीचा इ.5 वी ते 10 वी आणि 11 वी 12 पर्यंतच्या सर्व विद्यार्थांना निःशुल्क मोफत शिक्षण सवलत (इबीसी)चे शिबिर रुई(ता.इंदापूर)येथील श्री बाबीर विद्यालयात संपन्न झाले.इंदापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी श्री बाबीर विद्यालय, रुई येथे शिबीर दिनांक 17 व 18नोव्हेंबर असे दोन दिवस घेण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील 62 शाळांनी इबीसी प्रस्ताव सादर केले. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम यांचे आदेशान्वये व वरिष्ठ लिपिक श्रीमती छाया कराळे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली शिबीर झाले.इंदापूर तालुका शिक्षेकेत्तर संघटनेचे तालुका सचिव दत्तात्रय काळे, निमसाखरचे बरकत डांगे, कौठळीचे मिसाळ , वरकुटे खुर्दचे शिंदे,निमगावचे देवकर, काटीचे कुबेर, कळसचे मोरे,लाकडीचे चव्हाण यांनी दोन दिवस शिबिराचे काम पाहिले.
या शिबिराचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव जगन्नाथ पाटील यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा