इंदापूर;ठाकूरवाडी जिल्हा प्राथमिक शाळेत 4 थी शिक्षण परिषद संपन्न झाली.

ठाकूरवाडी जिल्हा प्राथमिक शाळेत 4 थी  शिक्षण परिषद संपन्न झाली. 


इंदापुर (दि)प्रतिनिधी; महेश गडदे.

दि.१८/१०/२०२२ रोजी ठाकूरवाडी जिल्हा प्राथमिक शाळेत 4 थी शिक्षण परिषद संपन्न झाली. 

या कार्यक्रमास कालठण केंद्राच्या केंद्र प्रमुख कदम मँडम, माळवाडी ग्रामपंचायत चे सरपंच श्री. राघू मदने,शा.व्य.स. अध्यक्ष, सदस्य, कालठण केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव वाघमोडे व ग्रामस्थ बंधु भगिनी, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. 


प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेला सहकार्य करणारे सरपंच श्री रघु मदने श्री. लक्ष्मण गडदे सर, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक व ग्रामस्थ बंधु भगिनी यांचा शाळेतर्फे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .

यावेळी ठाकूरवाडी शाळेचे पालक मुजावर सर आणि मुजावर मँडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्पोर्ट्स ड्रेस भेट दिले. 

तसेच केंद्र प्रमुख सन्माननीय कदम मँडम यांचा कालठण केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रशासकीय सूचना सांगून सर्वांचे आभार मानून शिक्षणपरिषदेचा समारोप झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.