विस कि.मी मधील सर्व वाहनांना टोलचे मोफत पास मिळाले पाहिजे:संजयभैय्या सोनवणे.

 विस कि.मी मधील सर्व वाहनांना टोलचे मोफत पास मिळाले पाहिजे:संजयभैय्या सोनवणे.



इंदापूर,प्रतिनिधी:महेश गडदे.


 पुणे सोलापूर हायवेवर सरडेवाडी टोल नाका प्रशासन स्थानिक युवकांच्या व्यवसायावर अन्याय करत आहे .तसेच स्थानिक वाहनांची आर्थिक पिळवणूक करत आहे टोल मध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्या ऐवजी बाहेर च्या कामगारांना याठिकाणी कामावर घेतले जाते,

20 कि.मी.मधील सर्व वाहनांना मोफत पास मिळाले पाहिजेत,हायवेवरील सर्व कॅमेरे टोल प्रशासनाने तात्काळ सुरू करावेत , 

हायवेवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होत आहेत ते थांबले पाहिजे, टोल हद्दीमध्ये सर्विस रोडवर अतिक्रमण असताना त्यांना अभय दिले जाते. 


आणि स्थानिक युवकांनी चहाच्या टपर्या सुरू केल्या आहेत त्यांना मात्र हुसकावून लावले जात आहे,

या मागण्या मान्य न केल्यास असे अनेक गंभिर विषय घेऊन लवकरच या टोलच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले.या विषयावर त्यांनी नागरिकांन सोबत ही चर्चा केली आहे. 

या मिटिंगला कुरूमूदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.नारायणजी गायकवाड, तरटगांव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच मा.पोपट माने,ग्रा.प.सदस्य मा.राजू सोनवणे,ग्रा.स.राजू लावंड, हिंगणगाव ग्रा.सदस्य मा.गणेश शिंगाडे ,रांजणी भिमानगरचे मा उपसरपंच तानाजी गायकवाड ,वाहन संघटनेचे अध्यक्ष मा.विनोद मखरे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीनराव आरडे , युवा नेते विशाल जगताप,सोनू ढावरे, संकेत गायकवाड,आढेगाव चे शाहु वाघ,गागरगांव चे राहुल लोंढे प्रत्येक गावातील प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली .

 दि.21/9/2022 रोजी रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे हे इंदापूर चे तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब तसेच इंदापूर चे पोलिस निरीक्षक मा.तय्युब मुजावर साहेब यांची भेट घेऊन चर्चा करून आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला माणूस" जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात-भाजपा नेते तानाजी मारकड.

श्री बाबिर् विद्यालय रुई येथे २३ वर्षांनी माजी विद्यार्थी व् शिक्षक स्नेह मेळावा