इंदापूर:संत तुकाराम महाराजांच्या पालखीरथ बैलजोडीचे पडस्थळ येथे भीमा स्नान.
इंदापूर:संत तुकाराम महाराजांच्या पालखीरथ बैलजोडीचे पडस्थळ येथे भीमा स्नान.
इंदापुर,प्रतिनिधी:महेश गडदे.
यावर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे हे ३३७ वे वर्ष आहे.श्रीक्षेत्र देहू संस्थांनवरून पालखी निघालेला आज अकरावा दिवस आहे. इंदापूर मुक्कामी काल पालखी सोहळ्याचे दुसरी गोल रिंगण पार पडले. या पालखी सोहळ्यासाठी रथ ओढण्याचे काम करणाऱ्या बैलजोडीस आज पडस्थळ गावकऱ्यांच्या वतीने भीमा नदीत कोटलिंगनाथ मंदिराच्या बाजूला भीमा स्नान घालण्यात आले. या भिमा स्नानासाठी परशुराम रेडके, महेंद्र रेडके, लक्ष्मण मारकड यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात बैलांना साबण वगैरे लावून त्यांना स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. बैलांना हलके वाटावे म्हणून नदीमध्ये खोल पाण्यात पोहु घालण्यात आले. पडस्थळ चे प्रगतशील बागायतदार परशुराम रेडके यांच्या घरी बैलजोडीची विधिवत पूजा करून त्यांना वैरण घालण्यात आली. यावेळी पांडुरंग मारकड, संदिपान मारकड, बळीभाऊ रेडके, महेंद्र रेडके तसेच गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री.संत तुकाराम महाराज पालखी संस्थान सोहळ्याच्या बैलजोडीचे मालक ज्ञानेश्वर शेडगे व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. पडस्थळ गावकऱ्यांच्या वतीने त्यांचाही सन्मान करण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा