आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री बाबिर विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला योगा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री बाबिर विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला योगा.



प्रतिनिधी :महेश गडदे.

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रूई(बाबीरनगरी) ता. इंदापूर, येथे 'श्री बाबीर विद्यालयामध्ये 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्था संलग्न युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्राच्या वतीने योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,

या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व आत्माराम पाटील (भाऊ) यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील होते 

यावेळी उपस्थित सरपंच यशवंत कचरे, मुख्याध्यापक पाटील सर 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड, सरचिटणीस अविनाश मोहिते, नेहरू युवा केंद्राचे विकास कणसे, संदीप बारवकर, उपस्थित होते, यावेळी योग प्रशिक्षक सोनवणे सर यांनी प्रात्यक्षिके सादर करून घेतली,व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावडे सर यांनी केले, यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते, 

यावेळी योग शिक्षक सोनवणे सर,व जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया,आहार विहार, यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले,*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.