मा.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुई येथे विविध कार्यक्रम

मा.पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुई येथे विविध कार्यक्रम.


विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप करताना.


प्रतिनिधि:महेश गडदे.
मा.श्री विश्वासराव नारायणराव देवकाते (नाना पाटील) मा.अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे,अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास प्रतिष्ठान बारामती, यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रमोद डोंबाळे सर व श्री पै.आप्पा देवकाते - वन कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आले.

इंदापूर रुई तळेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व न्हावी गावाच्या वन क्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी टॅकर द्वारे पाणी सोडण्यात आले, 


यावेळी प्रमुख उपस्थिती मा.प्रताप (आबा) पाटील मा.पुणे जिल्हा परिषद सदस्य पुणे, मा .श्री अभिजीत भैया तांबिले जिल्हा परिषद सदस्य पुणे, वनपाल अशोक नरुटे जंक्शन विभाग रुई गावचे ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच यशवंत कचरे,पोलीस पाटील अजित सिंह पाटील,उदय पाटील उपाध्यक्ष श्री बाबीर विद्यालया रुई,बंडू दादा डोंबाळे मा.तंटामुक्ती अध्यक्ष रुई,श्री तानाजी मारकड, युवा नेते,अध्यक्ष जय हनुमान बहुउद्देशीय संस्था.राजू शिंदे सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री बाबीर देवाच्या यात्रेला शनिवारपासून प्रारंभ!

महिलांच्या बँक खात्यात आमचे सरकार प्रति महिना जमा करणार रु. 3000 - हर्षवर्धन पाटील

स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितिचा प्रवीण माने यांना पाठींबा.