पुणे येथे भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.
पुणे येथे भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.
पुणे:प्रतिनिधी-महेश गडदे.
पुणे येथे भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले. याप्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि इतरही सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मांडलेले प्रमुख मुद्दे:
- महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे.
सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात.
आज या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुणेकरांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागतो आहे.
- शेतीवर अवलंबून असलेल्या रोजगाराचा भार आज अधिक आहे. तो सहन करण्याची क्षमता आहे का, याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे सेवाक्षेत्रावर मोठी जबाबदारी येते आहे आणि त्यातून शहरीकरणाचा पसारा वाढतो. अशावेळी वाढत्या शहरीकरणाला चांगल्या सुविधा देणे क्रमप्राप्त ठरते.
- सांडपाण्यावर प्रक्रिया यावर आमच्या सरकारच्या काळात मोठा भर देण्यात आला. तो याहीपुढे कायम ठेवला पाहिजे. त्यातून सिंचनाच्या पाण्यावर ताण येणार नाही. यातून शहरी आणि ग्रामीण असे वाद सुद्धा कमी होतील.
- पुण्यातील प्रदूषण कमी करायचे असेल तर वाहतुकीच्या विविध साधनांकडे अगत्यपूर्वक लक्ष द्यावे लागेल. गेल्या काळात ते दिले गेले, आताही ते काम तसेच पुढे जाईल, अशी मला आशा आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा