पोस्ट्स

सरपंच अन् ग्रामसेवक गावगाड्यातील विकासरथाची दोन महत्त्वाची चाकं”

इमेज
सरपंच अन् ग्रामसेवक गावगाड्यातील विकासरथाची दोन महत्त्वाची चाकं” Zee  महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे.)   “गावाचा विकास हा केवळ योजनांच्या घोषणांमधून होत नाही, तर तो प्रभावी नेतृत्व, सक्षम प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या समन्वयातून होत असतो." भारतीय लोकशाहीची खरी ताकद ही खेड्यापाड्यांत दडलेली आहे. देशाच्या विकासाचा पाया हा ग्रामीण भागात असून ग्रामविकासाशिवाय राष्ट्रविकासाची कल्पनाही करता येत नाही. संविधानाच्या ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतराज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा मिळाल्यानंतर ग्रामपंचायत ही ग्रामीण स्वराज्याची प्रमुख संस्था बनली. या ग्रामपंचायतीच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणून ‘सरपंच आणि ग्रामसेवक’ ही दोन पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. गावगाड्याच्या विकासरथाची ही दोन चाकं आहेत. यापैकी एक चाक लोकप्रतिनिधित्वाचे तर दुसरे प्रशासकीय कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. दोघांमध्ये समन्वय असेल तर गावाचा विकास वेगाने होतो; परंतु समन्वयाचा अभाव असेल तर विकासकामे रखडतात. गावच्या नेतृत्वाचे लोकशाही प्रतीक सरपंच:-            सरपंच हा ग्रामपंचायतीचा ...

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी

इमेज
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रविण भैय्या माने व इतर पदाधिकारी निवेदन देताना. Zee महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे) महावितरण अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या भारनियमनामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेले सिंचन, विहिरी, बोअरवेल तसेच विविध विद्युत पंपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र सततच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देणे अशक्य होत असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी उभ्या पिक...

इंदापूर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाचे लक्ष वेधून घेणारा आश्वासक युवा चेहरा श्रीराज भरणे.

इमेज
इंदापूर तालुक्यातील समाजकारण व राजकारणाचे लक्ष वेधून घेणारा आश्वासक युवा चेहरा श्रीराजभैया भरणे”-  डॉ. प्रकाश पांढरमिसे Zee  महाराष्ट्र न्यूज. ( महेश गडदे) “माणुसकीच्या वाटेवर चालणारा दीप हवा, जनतेच्या वेदनांना समजणारा जीव हवा… राजकारणाला समाजकारणाची जोड देणारा, इंदापूरच्या मातीत असा तरुण नेता हवा…!”           महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांची ओळख केवळ राजकीय वारशामुळे मर्यादित राहत नाही तर त्यांच्या कार्यातून, लोकांशी असलेल्या आपुलकी,आपलेपणा व आत्मीय नात्यातून आणि समाजासाठी असलेल्या सामाजिक बांधिलकीतून त्यांना स्वतंत्र स्थान प्राप्त होते. इंदापूर तालुक्यात आज अशाच एका अभ्यासू, संयमी आणि आश्वासक युवा चेहरा असणाऱ्या युवा नेतृत्वाची चर्चा सर्वत्र होताना दिसते आणि ते नाव म्हणजे बोरी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्रीराजभैया भरणे.             महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून जनमानसात विशेष लोकप्रिय ओळख निर्माण केलेले ना. दत्तात्रय भरणे मामा ...

इतिहास विषयातून करिअरच्या संधी - डॉ. प्रकाश पांढरमिसे.

इमेज
इतिहास विषयातून करिअरच्या संधी - डॉ. प्रकाश पांढरमिसे. Zee महाराष्ट्र न्यूज.( महेश गडदे.) आजच्या स्पर्धेच्या आणि माहिती तंत्रज्ञानप्रधान डिजिटल युगात “इतिहास” हा विषय अनेकदा केवळ भूतकाळातील घटना, राजे-महाराजे आणि युद्धांचा अभ्यास म्हणून पाहिला जातो. परंतु वास्तवात इतिहास हा विषय केवळ कालक्रमाचा अभ्यास नसून समाज, संस्कृती, राजकारण, अर्थव्यवस्था आणि मानवी विचारप्रवाह समजून घेण्याचे प्रभावी माध्यम आहे. इतिहास विषय विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला, विश्लेषणात्मक दृष्टिकोनाला आणि निर्णयक्षमतेला आकार देतो. त्यामुळे इतिहास विषयातून करिअरच्या असंख्य संधी आज उपलब्ध होत आहेत. इतिहासाचा अभ्यास करणारा विद्यार्थी केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो घटनांचे कारण, परिणाम आणि त्यातील बदलांचा सखोल अभ्यास करतो. म्हणूनच इतिहास शिकणारा विद्यार्थी विश्लेषक, संशोधक, विचारवंत आणि प्रभावी नेतृत्वगुणांचा धनी बनतो. आज युपीएससी, एमपीएससी, राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, एएसओ, एनडीए, सीडीएस यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास विषयाला विशेष महत्त्व आहे.             भारतीय र...

ज्ञानाचा ज्ञानदीप, नेतृत्वाची यशस्वी वाट: ज्ञानसूत प्राचार्य डॉ. संजय चाकणे”- डॉ. प्रकाश पांढरमिसे.

इमेज
ज्ञानाचा ज्ञानदीप, नेतृत्वाची यशस्वी वाट: ज्ञानसूत प्राचार्य डॉ. संजय चाकणे”-डॉ. प्रकाश पांढरमिसे                Zee महाराष्ट्र न्यूज.(महेश गडदे). पुणे.ता.३०: शिक्षणसंस्था ही केवळ ज्ञान देणारी जागा नसून, ती समाजाच्या विचारविश्वाची पायाभरणी करणारी आणि भविष्यातील नागरिक घडवणारी एक जिवंत प्रयोगशाळा असते. या प्रयोगशाळेला दिशा देणारा, तिच्या प्रवाहाला आकार देणारा आणि तिच्या गुणवत्तेला उत्तुंग उंची देणारा केंद्रबिंदू म्हणजे खडकी शिक्षण संस्थेचे,टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी पुणे येथे कार्यरत असणारे उपक्रमशील प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपल्या भूमिकेला केवळ प्रशासकीय चौकटीत मर्यादित न ठेवता, तिला मूल्याधिष्ठित, दूरदृष्टीपूर्ण आणि परिवर्तनवादी नेतृत्वाचे स्वरूप दिले आहे. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय म्हणजे टी. जे. कॉलेज या महाविद्यालयास नॅक अ ग्रेड,लगेच ऑटोनॉमस कॉलेज बनिविले, विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातील १२ ऑटोनॉमस आणाऱ्या महाविद्यालयाच्या पंगतीत टी. जे. महाविद्यालयास नेहून बसविले. हे त्यांनी अतिशय कल्पकतेने व परिवर्तनाच्या दिशे...

तीन लाखांचे दागिने केले परत, या प्रमाणिक पणाचे कौतुक - अविनाश मोहिते.

इमेज
तीन साडेतीन लाखांचे दागिने केले परत ,या प्रमाणिक पणाचे केले कौतुक- अविनाश मोहिते. निमसाखर येथे कुंडलिक घोडे यांचा सन्मान करताना अविनाश मोहिते व इ. पदाधिकारी. Zee महाराष्ट्र न्यूज. (महेश गडदे.) इंदापूर.ता.३०: दि.२४ एप्रिल २०२६. रोजी निमसाखर बस स्थानक येथे पुनम मारूती  बरकडे, रेडणी.या प्रवासी महिलेची बॅग विसरली होती, ती बॅग त्या महिलेस निमसाखर येथील न्यू ‌साईराज अँड कोल्ड्रिंक्स चे सर्वेसर्वा व मा.ग्रामपंचायात सदस्य श्री.कुंडलिक तुकाराम घोडे यांनी प्रामाणिकपणे परत केली, ती बॅग परत करत असताना त्या महिलेला अतिशय आनंद झाला, कारण  त्या बॅगेमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये चे किमतीचे दागिने होते,  ही बातमी समजताच, इंदापूर तालुका भाजपा चिटणीस अविनाश मोहिते, यल्लाप्पा देवकुळे, बाळासाहेब घोडे, पवन तोडकर, पोपट शेळके, यांनी निमसाखर येथे त्यांचा हॉटेल न्यू साईराज अँड कोल्ड्रिंक्स या हॉटेलमध्ये भेट देऊन त्यांचे कौतुक केले, मातंग समाज हा खुप प्रमाणिक व विश्वासु आहे, याचे ज्वलंत उदाहरण तुम्ही आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ने असे निस्वार्थ कार्य केले पाहिजे, त्यांच्या या...

“निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”

इमेज
“ निरा-वागजचा अभिमान, बारामतीची शान, तरुणाईचं प्रेरणास्थान: विश्वासराव देवकाते तथा नाना पाटील”     Zee महाराष्ट्र न्यूज . (महेश गडदे.) पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जनतेच्या मनात घर करून राहिलेले आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान विश्वासराव देवकाते (नाना पाटील) यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नव्हे; तो ग्रामीण विकासाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा स्मरणदिन आहे. नेतृत्व हे केवळ पदावरून मोजले जात नाही. ते लोकांच्या विश्वासातून आणि कृतीतील सातत्यातून सिद्ध होते.याचा प्रत्यय नानांच्या आजवरच्या वाटचालीतून वारंवार येतो.         बारामती तालुक्यातील निरा-वागज या मातीतून घडलेले नाना पाटील हे त्या भूमीचे संस्कार, कष्ट आणि जिद्दीचे प्रतीक आहेत. शेतकऱ्यांच्या आशा, शेतमजुरांच्या संघर्ष आणि ग्रामीण समाजाच्या स्वप्नांना त्यांनी आपल्या कार्यातून दिशा दिली. म्हणूनच “निरा वागज हे गाव नानाचे गाव” ही भावना घोषवाक्यापुरती मर्यादित राहत नाही तर ती लोकांच्या मनातील श्रद्धा ठरते.         लोकनेते अजित पवार (अजितदादा) यांच्या विश्वासू स...